शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सावधान..! हृदयविकाराचं वय घटतंय!

By admin | Updated: September 24, 2015 00:08 IST

तिशीतही बसतो धक्का : व्यायामाचा अभाव, तणाव, जंकफूड कारणीभूत--हृदयविकार जागरूकता दिन

प्रकाश वराडकर - रत्नागिरी --व्यायामाचा अभाव व खाण्याच्या सवयींधील बदल, फास्ट फूडचे दुष्परिणाम आणि अनेक प्रकारच्या तणावांमुुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराचे झटके येण्याचे वय हे ३० पर्यंत कमी झाले आहे. धकाधकीच्या जीवनात व्यायामाचे महत्व लक्षात घेऊन आपणच आपल्यासाठी सतत धडधडत चालणाऱ्या हृदयाची काळजी घेतली तर आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकेल व दिर्घायुषी होता येईल, असे मत हृदयविकार तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सर्वत्र स्पर्धा आहेच परंतु ती अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे बुध्दिमत्तेचा, कार्यक्षमतेचा कस लागत आहे. बेरोजगारीची समस्या आहे. दैनंदिन जीवनातील समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे स्ट्रेस किवा तणावाच्या वातावरणात सातत्याने वावरावे लागत असल्याने हृदयाचे आरोग्य खालावत चालले आहे. त्यातच धावपळ, दगदग वाढल्याने घरचे जेवण मिळणे कठीण बनले आहे. परिणामी कुठे मिळेल तेथे हॉटेल वा अन्य अन्नपुरवठा केंद्रातील खाद्यपदार्थ सेवन केले जात आहेत. त्याचा दर्जा काय, याचा कोणताही विचार होताना दिसून येत नाही. फायद्याच्या हेतूने काही जंक फूड निर्माते आरोग्याला हानीकारक पदार्थांचा अन्नपदार्थ निर्मितीसाठी वापर करतात. त्याचा परिणाम आरोग्यावर, हृदयावर होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात हृदयविकाराचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शासकीय रुग्णालयात जेवढ्या संख्येने हृदयविकाराचे रुग्ण दाखल होतात त्यापेक्षा अधिक रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हृदयाची बायपास सर्जरी, अ‍ॅँजियोप्लास्टी करून घेण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी विशेष प्रबोधन मोहीम राबविण्याचीही आवश्यकता भासणार आहे. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षाच्या काळात हृदयविकाराचा झटका आलेल्यांची संख्या ७०७ एवढी आहे. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांची संख्या ६७५ होती. तर २०१५-१६ या वर्षाच्या पुर्वार्धात ही संख्या ३२ आहे. आर्थिक क्रयशक्ती असलेले लोक या आजारासाठी खासगी रुग्णालयातून उपचार घेतात. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या वेगळी आहे. २०१३-१४ या वर्षी राजीवगांधी जीवनदायीनी योजना सुरू होती. त्याचा लाभ अनेकांनी घेतला. शालेय आरोग्य तपासणीत २०१३-१४ या वर्षी ६२ मुलांना हृदयाबाबत समस्या असल्याचे आढळून आले. त्यातील ३२ जणांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. १२ जणांवर औषधोपचार झाले. १६ मुलांचे पालक मुुलांवर शस्त्रक्रीया करण्यास राजी नाहीत. २ मुलांची शस्त्रक्रीया करावयाची आहे. २०१४-१५ मध्ये शालेय आरोग्य तपासणीत ३६ मुले हृदयाच्या समस्येने ग्रासलेली सापडली. त्यातील २६ जणांवर शस्त्रक्रीया झाली. ६ जणांवर औषधोपचार करण्यात आले तर ३ मुलांच्या पालकांनी मुलांवर शस्त्रक्रीयेस विरोध केला. एका मुलावर शस्त्रक्रीया होणे बाकी आहे. २०१५-१६ या वर्षातील गेल्या सहा महिन्यांच्या काळात शालेय आरोग्य तपासणीत ३९ मुलांना हृदयसमस्या असल्याचे समोर आले. त्यातील २६ जणांच्या शस्त्रक्रीया झाल्या. त्यातील २ पालकांनी मुलांवर शस्त्रक्रीयेस नकार दिला. तर ११ जणांवर शस्त्रक्रीया केल्या जाणार आहेत.अडीच वर्षात ८४ मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रियाजिल्ह्यात हृदयविकाराची व्याप्ती वाढत चालली आहे. पूर्वी ४० ते ४५ वयानंतर सर्वसाधारणपणे लक्षणे दिसणाऱ्या हृदयविकाराने आता तिसाव्या वर्षातच आपला प्रभाव दाखविण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे ही स्थिती असतानाच लहान मुलांच्या हृदयाबाबतच्या समस्याही वाढल्या आहेत. शालेय विध्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत गेल्या अडीच वर्षात १३७ मुलांना हृदयाबाबत समस्या असल्याचे दिसून आले आहे. त्यातील ८४ जणांवय हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. १८ जणांना औषधोपचार केले गेले. २१ मुलांचे पालक त्यांच्या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यास तयार नाहीत. उर्वरित १४ जणांची शस्त्रक्रिया व्हायची आहे.तरुण वयातच हृदयविकाराची समस्या गंभीर बनली आहे. व्यायामाचा अभाव, खाण्यातील बदल, ताणतणाव यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, योग्य आहार, ताण तणावातून बाहेर येणे हे उपाय हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तिसाव्या वर्षीच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे, ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. - डॉ. प्रल्हाद देवकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.