शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कारची दुचाकीला धडक; एक ठार

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

बायपासवर मळगाव येथे अपघात

सावंतवाडी : स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत विनायक दत्ताराम जोशी (वय ६७, रा. मळगाव-मांजरेकरवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विजय गोपाळ नार्वेकर (६२, मळगाव-रस्तावाडा) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-आजगावकरवाडी येथे आज, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. जखमी नार्वेकर यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. झाराप-पत्रादेवी महामार्गावरील आजगावकरवाडी येथून विनायक दत्ताराम जोशी व विजय गोपाळ नार्वेकर हे दोघे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मांजरेकर-वाडीतील जोशी यांच्या घरी अ‍ॅक्टिव्हा या दुचाकीने चालले होते. त्यांची दुचाकी आजगावकरवाडीतील झाराप-पत्रादेवी महामार्गावर आली असता गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अंदाज विजय नार्वेकर यांना आला नाही. त्यांनी दुचाकी रस्त्यातच उभी केली. कारचालक अशोक लक्षे यांनी दुचाकीस पाहिले होते; परंतु कारचा वेग आवरता न आल्याने भरधाव वेगातील कारने (एमएच४३ जे ४२२७) दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर दुचाकी सुमारे शंभर ते दीडशे फूट फरफटत गेली, तर विनायक जोशी हे ५० फूट लांब फेकले गेले. यात जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. दुचाकीचालक विजय यांच्या हात, पाय व डोक्याला दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.या अपघातानंतर झाराप पत्रादेवी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या महामार्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर गाड्यांच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.मृत विनायक जोशी हे मुंबई येथे दूरसंचारमध्ये कामाला होते. अलीकडेच ते गावी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुले असा परिवार आहे.