कणकवली : कारचालकाचा ताबा सुटल्याने दिगवळे, बामणदेववाडी येथे अल्टो कार अपघातग्रस्त झाली. शनिवारी सकाळी ७ वाजता हा अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. यातील दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला गोवा- बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनवडे- दुर्गवाडी येथे शंकर वासुदेव सावंत आपली पत्नी श्वेता, मुलगा निवृत्ती, मुलगी मीरा आणि गुरूनाथ गुणाजी परब यांच्यासह गणेशोत्सवासाठी आले होते. गणेशोत्सव करून शनिवारी सकाळी सर्वजण अल्टो कारमधून मुंबईला चालले होते. दिगवळे येथे एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याशेजारी झाडाला जाऊन आदळली. यात सर्वजण जखमी झाले. कणकवली पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल मोहन राणे हे याच मार्गावरून जात होते. अपघात दृष्टीस पडताच त्यांनी पोलीस स्थानकात कळवून जखमींना रूग्णालयात नेण्यास मदत केली. या अपघातात शंकर सावंत यांची लहान मुलगी मीरा हिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी मीरा हिला गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची पोलिसांत नोंद नव्हती. (प्रतिनिधी)
कार अपघात; पाच जखमी
By admin | Updated: September 7, 2014 00:35 IST