शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भगव्यासाठी लाविले पणाला प्राण !

By admin | Updated: March 25, 2016 23:39 IST

किल्ले सिंधुदुर्गवर फडकणार भगवा ध्वज : आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

मालवण : नव्वदच्या दशकात मालवणात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरच्या झेंड्यावरून ‘झेंडा आंदोलना’चे मोठे रान पेटले होते. शिवप्रेमींनी किल्ल्याच्या तटावर लावलेला भगवा ध्वज लावल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ध्वज उतरविण्यात नव्हे तर कापण्यात आला होता. त्यानंतर शिवप्रेमींच्या भावनांचा उद्र्रेक होत उग्र आंदोलन झाले. अनेकांवर बेसुमार लाठीचार्ज झाला. शेकडो शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले. प्रकरणाची तत्कालीन युती शासनाने गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, पालकमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर भगवा झेंडा उभारण्यात आला नि संतप्त झालेले शिवसैनिक शांत झाले. आजही ‘झेंडा’ आंदोलनाच्या आठवणीने अनेकांच्या नयनात अश्रू आपसूकच ओघळतात. शिवप्रेमींचा २०-२५ वर्षापूर्वीचा तो झालेला भावनेंचा उद्र्रेक पाहता किल्ले सिंधुदुर्गवरील जीर्ण झालेला भगवा ध्वज आमदार वैभव नाईक यांच्या स्वनिधीतून बसविण्यात येणार आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवारी किल्ले सिंधुदुर्गवर भगवा ध्वज पुन्हा एकदा नव्याने फडकणार आहे. ४० फुट उंचीचा फिरता ध्वज असून तीन दिवसापूर्वी किल्ले सिंधुदुर्गावर ध्वज आणि इतर साहित्य नेण्यात आले आहे. २६ रोजी शिवजयंतीनिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भगव्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. किल्ले सिंधुदुर्गचे २२ एप्रिल रोजी ३५० व्या वर्षात पदार्पण करत असून वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या भगव्या ध्वजाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. गेली काही वर्षे अखेरची घटका मोजत असलेल्या या आंदोलनानंतरच्या ‘भगव्या’ला आमदारांकडून पुन्हा एकदा उर्जितावस्था लाभली आहे. भगवा ध्वज व अन्य साहित्य दांडी किनाऱ्यावर आणल्यानंतर तेथे उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये भगव्याच्या आठवणी ताज्या झाल्या. भगवा ध्वज हा शिवप्रेमींची अस्मिता आहे. शिवप्रेमींनीच एका रात्रीत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटावर भगवा ध्वज लावला होता. छोटू सावजी यांनीही आठवणींना उजाळा दिला. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख नंदू गवंडी, उपशहरप्रमुख किरण वाळके, पराग खोत आदी शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)