शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांचे परवाने रद्द करा : नीलेश राणे

By admin | Updated: October 7, 2016 23:55 IST

चौपदरी रस्ता नेमका कुठे, कसा होणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनाही नाही. समन्वयाचा अभाव आहे.

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या स्थितीला महामार्ग डांबरीकरण करणारे ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे आर. डी. सामंत यांच्यासह संबंधित सर्वच ठेकेदारांचे परवाने रद्द करावेत. खड्डेमय महामार्गावर आता एक जरी जीव गेला तर त्याला हे ठेकेदारच जबाबदार राहतील, असा हल्लाबोल कॉँगे्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.महामार्गावरील खड्डे चिरे, पेवर ब्लॉकने बुजविण्यात आले. आज त्याचीही दयनीय स्थिती आहे. मुंबई महानगरपालिकेने पेवर ब्लॉक काढा, असे आदेश दिले आहेत. मात्र, आपल्याकडे महामार्गावर पेवर ब्लॉक बसविले जात आहेत. डांबरीकरणाच्या मुदतीआधी खड्डे पडतातच कसे, देखभाल दुरुस्ती का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. सामंत यांचा मुलगा आमदार आहे. निदान त्यांच्या मतदारसंघातील महामार्ग तरी नीट करावा. बांधकाम विभागात सी. सी. टी. व्ही. लावा. निविदा प्रक्रिया बंद खोलीत करू नका. दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असेही ते म्हणाले. चौपदरीकरणासाठी अजून जमीन संपादन पूर्ण झालेले नाही. चौपदरी रस्ता नेमका कुठे, कसा होणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनाही नाही. समन्वयाचा अभाव आहे. वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण डिसेंबर २०१६मध्ये होईल, असे जाहीर केले होते. हे काम पूर्ण होण्यास किती वर्षे लागणार हे गडकरीनाच माहीत आहे, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी...ते केवळ मंत्रीपदासाठी भुकेलेलेजैतापूर प्रकल्पाचा विषय निवडणुकीपुरता उरला आहे. प्रकल्पग्रस्तांपैकी ९० टक्के लोकांनी नुकसानभरपाई स्वीकारली आहे. खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्प रद्द करण्यासाठी रत्नागिरीत नव्हे; जंतरमंतरवर उपोषण करावे, लोकसभेत भांडावे. आमदार राजन साळवी यांना एका शिक्षकाची बदली करता येत नाही ते जैतापूर प्रकल्प कसा रद्द करणार? पालकमंत्री रवींद्र वायकर यांना कोयनेचे पाणी मुंबईत नेण्याची घाई झाली आहे. या तिघांच्या तीन तऱ्हा आहेत. येथील लोकप्रतिनिधी केवळ मंत्रीपदासाठी भुकेलेले आहेत, असा आरोप राणेंनी केला.