शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

धिंंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना दणका

By admin | Updated: October 30, 2015 23:18 IST

दापोली तालुका : मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील घटना

दापोली : तालुक्यातील मुरूड येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी मद्यप्राशन करून समुद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी दापोलीतील जागरूक पत्रकारांनी ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना त्यांनी आरक्षित केलेल्या खोल्यांमध्ये जाण्यास भाग पाडले. तसेच समुद्रावर धिंगाणा घातल्यास कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा शब्दात तंबी दिली. शनिवार आणि रविवारी मुरूड येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळलेली असते. अनेकवेळा मद्यपी पर्यटक आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. तसाच प्रकार नुकताच रात्री समुद्रावर घडला. पर्यटक मद्याच्या नशेत समुद्रावर धिंगाणा घालत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकारांजवळ संपर्क साधून पोलिसांना या घटनेची माहिती देण्याची विनंती केली. त्यानुसार पत्रकारांनी पोलीस स्थानकात हा प्रकार सांगितला. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुरूड येथे धाव घेतली. त्यांनी मद्यपी पर्यटकांची चांगली कानउघाडणी केली. त्याचप्रमाणे पर्यटक ज्या रिसार्टमध्ये उतरले होते. तेथील आरक्षित खोलीत त्यांना लगेच जाण्यास भाग पाडले. त्याचप्र्रमाणे समुद्रावर पुन्हा धिंंगाणा घालण्याचा प्रयत्न केलात, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला. यामुळे नरमलेल्या मद्यपी पर्यटकांनी आपल्याकडून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशी विनवणी करून पोलिसांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. दरम्यान, मुरूड येथे पर्यटकांनी मद्य पिवून धिंंगाणा घालण्याचा प्रकार नवीन नाही. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या होत्या. यामुळे सायंकाळी मुरूड येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने धिंंगाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात असल्याचा आक्षेप ग्र्रामस्थांकडून घेतला जात आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची तंबी : शनिवार, रविवारी गर्दीदापोली तालुक्यातील मुरूड याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, पर्यटकांच्या अरेरावीमुळे याठिकाणी ग्रामस्थांबरोबर वादविवादही होतात. समुद्रकिनाऱ्यावर धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन तंबी दिली आणि आरक्षित खोल्यांमध्ये पाठविले.पोलीस नेमावामुरूड किनाऱ्यावर पर्यटकांकडून धिंगाणा घालण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.