शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

डोर्लेतील अपहरण नाट्याचा पर्दाफाश

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

सूत्रधारासह पाच जणांना पोलिसांनी केली अटक

रत्नागिरी : आर्थिक देवघेवीतून डोर्ले येथील प्रसाद हळदवणेकर यांचे शिवारआंबेरे येथून अपहरण झाल्याचे उघडकीस आले. अपहरणकर्त्यांनी हळदवणेकर यांच्याकडील एक मोबाईल काढून घेतला. मात्र, दुसरा मोबाईल तसाच राहिल्याने हळदवणेकर यांनी घरी पत्नीला फोन करून अपहरणाची माहिती दिली व ठिकाण कळवल्याने अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी मोहीम राबवल्यानंतर पाच अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.हळदवणेकर यांच्या अपहरण नाट्यामुळे पावस परिसरात खळबळ उडाली होती. डोर्ले येथील प्रसाद हळदवणेकर यांनी व्यवसायाकरिता संजय गांधी यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. या सर्व व्यवहारात चोरवणे, राववाडी येथील सदानंद शंकर कांबळे हा मध्यस्थ होता. हळदवणेकर यांच्याकडून दिलेली रक्कम परत न मिळाल्यामुळे कांबळे याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने २५ जूनला सायंकाळी ६ वाजता शिवारआंबेरे कातळवाडी येथून हळदवणेकरचे अपहरण केल्याचा आरोप आहे. ज्या फार्म हाऊसवर प्रसादला डांबून ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणची माहिती प्रसाद यांनी रात्री फोन करुन पत्नीला दिली. पत्नीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी रात्री कांबळे यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकून हळदवणेकर यांना सोडवण्यात आले व पहारेकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रसादला अन्यत्र नेण्यासंदर्भात साथीदारांना कांबळेचा फोन आला. मात्र, त्याचवेळी ते साथीदार पोलीस ठाण्यात होते. त्यामुळे कांबळे जाळ्यात अडकला. पोलिसांनी सदानंद कांबळे, सुनील देसाई, अंबाजी भोंडे, श्रीकांत जंगम, राजेंद्र जंगम यांना अटक केली असून, न्यायालयात हजर केले. (प्रतिनिधी)