शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाºयांचा आक्षेप धुडकावत बांदा येथे खव्याची पोती नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा येथील दोन बेकरींमधून शनिवारी (२६ आॅगस्टला) मोठ्या प्रमाणात खवा जप्त करण्यात आला होता. मंगळवारी अन्नभेसळ प्रशासनाने या खव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर जप्त केलेली पोती बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात जमिनीत पुरण्यात आली. तसेच तो खवा नष्ट करण्यात आला. मात्र, याला त्या बेकरी मालकांबरोबरच बांदा व्यापारी संघाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा येथील दोन बेकरींमधून शनिवारी (२६ आॅगस्टला) मोठ्या प्रमाणात खवा जप्त करण्यात आला होता. मंगळवारी अन्नभेसळ प्रशासनाने या खव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर जप्त केलेली पोती बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात जमिनीत पुरण्यात आली. तसेच तो खवा नष्ट करण्यात आला. मात्र, याला त्या बेकरी मालकांबरोबरच बांदा व्यापारी संघाने आक्षेप घेतला. यावेळी अधिकाºयांनी व्यापारी संघाच्या पदाधिकाºयांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आपली कार्यवाही पूर्ण केली.पेढ्यामध्ये वापरण्यात येणाºया खव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे दिसून आल्याने सर्व ठिकाणी मिठाईच्या दुकानात झाडाझडती सुरू आहे. तर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी दोन कारमधून बनावट खवा पकडला होता. शनिवारी बांदा येथे पोलिसांच्या पथकाने सोळंकी आणि पटेल यांच्याकडून ७२ हजार रुपये किमतीचा ४५० किलो खवा जप्त केला होता. त्यामुळे बांदा येथे एकच खळबळ उडाली होती.दरम्यान, मंगळवारी अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी या जप्त खव्याचे नमुने घेत पडताळणीसाठी पाठविले. या जप्त खव्याची विल्हेवाट लावण्यासाठी या विभागाचे अधिकारी व्यंकटेश वेदपाठक व वर्षा खरात हे बुधवारी दुपारी बांदा पोलीस ठाण्यात दाखल झाले.दरम्यान, हा जप्त खवा जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीच्या सहायाने खड्डा मारण्यात आला होता. आपला जप्त खवा जमिनीत पुरला जाणार आहे, हे लक्षात येताच या बेकरी मालकांनी बांदा व्यापारी संघाकडे धाव घेत आपले नुकसान होत असल्याची कैफियत मांडली. बांदा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अभय सातार्डेकर, सचिव सचिन नाटेकर, सिद्धेश महाजन, संदेश पावसकर, आदींनी बांदा पोलीस ठाण्यात जात अधिकाºयांशी चर्चा करीत या बेकरी मालकांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.व्यापारी संघाचा आक्षेप आणि माघारयावेळी वेदपाठक यांनी प्रथमदर्शनी हा खवा नसून, बर्फीसदृश गोड पदार्थ असल्याचे दिसून येत आहे. हा पदार्थ बनविला कुठे? कधी बनविला? हा किती महिने वापरण्यासाठी योग्य आहे? हे प्रश्न अनुत्तरित असून, या पिशव्यांवर बॅच नंबरही नसल्याचे व्यापारी संघाच्या निदर्शनास आणून दिले. असे हे पदार्थ लोकांच्या जीविताला अपायकारक असल्याने ते आम्ही परत देऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे दफन करणेच आमच्या नियमात बसत असून, तुम्ही हवी तर या पिशव्यांची खात्री करू शकता, अशी सूचना व्यापारी संघाला केली होती. या पिशव्यांची खात्री करण्यात आली असता त्यावर कोणत्याही प्रकारचे बॅच अथवा हवी असलेली माहिती दिसून आली नाही. त्यामुळे अखेर व्यापारी संघाने माघार घेतली.