शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

स्वयंपूर्णतेसाठी व्यवसाय शिक्षण हवे : गीते

By admin | Updated: February 2, 2015 00:06 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा घेतांना जिल्ह्यात क्षयरोगाला आळा घालण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्नाची गरज आहे

रत्नागिरी : जिल्ह्यात बचतगटांची चळवळ चांगल्या पद्धतीने रुजत आहे. या चळवळीच्या माध्यमातून नवीन बचतगट निर्माण करण्याबरोबरच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळम पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.बचतगटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठीचे प्रयत्न अधिक गतिमान करायला हवेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बचत गट उत्पादनांचे विक्री केंद्र उभारावेत. तसेच रेल्वे स्टेशनवर ही उत्पादने विक्री करण्यासाठी स्टॉल उभारण्याबाबत संबधितांकडे प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे भाग २च्या, टप्पा १मधील प्रगतीपथावरील कामे वेगाने पूर्ण करावीत. तसेच टप्पा दोनसाठी नवीन प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी, त्यांनी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, इंदिरा आवास योजनांसह इतर योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा घेतांना जिल्ह्यात क्षयरोगाला आळा घालण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्नाची गरज आहे. तसेच कुष्ठरोग निवारणासाठीदेखील विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना गीते यांनी दिल्या. स्थानिक विकास कार्यक्रमाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. (प्रतिनिधी)