शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवगडकडे जाणारी बस रोखली

By admin | Updated: December 15, 2015 00:23 IST

मुणगे येथील प्रवाशास मारहाण : संबंधितांवर कारवाईचे देवगड स्थानकप्रमुखांचे आश्वासन

कुणकेश्वर : मुणगे येथील प्रवाशास एस. टी. चालक आणि वाहकाकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणावरुन मुणगे येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी तीन तास बस रोखून धरली. त्यामुळे या मार्गावर या बसने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. देवगड स्थानकप्रमुखांनी चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बस सोडली.याबाबत अधिक माहिती अशी की, मालवण-देवगड एस. टी. बस क्रमांक (एम. एच. २0 डी. ८२८९) देवगडकडे जाणारी ही देवगड आगाराची बस या बसमधील चालक, वाहकाने प्रवाशास मारहाण केली होती.देवगड आगारातून १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३0 वाजता सुटलेली देवगड -आचरा ही बस आचरा येथे ६ वाजून १0 मिनिटांनी पोहचली. आचरा येथे बस गेल्यानंतर सुमारे ५0 मिनिटे बस या ठिकाणी उभी राहिली. सायंकाळी ७ वाजता ही बस आचरा येथून मोर्वे येथे जाण्यास निघाली. या दरम्यान मुणगे येथे जाणाऱ्या प्रवाशाने बस उशिरा का सुटली? असे विचारले असता वाहक व प्रवासी यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी चालक दिनेश दुखंडे यांनी आचरा पूलावर बस थांबवून प्रवाशाच्या थोबाडीत मारत बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्या प्रवाशाने ही घटना गावातील ग्रामस्थांना सांगितली.ही बस मुणगे येथे मालवण येथून सकाळी ९.१0 वाजता आली. त्यावेळी भगवती मंदिर येथे ही बस ग्रामस्थांनी रोखून धरत चालकास मारहाणीबाबत जाब विचारला. तसेच देवगडचे आगारप्रमुख मुणगे येथे येतील त्याचवेळी बस सोडण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तरी सुध्दा चालकाने उध्दटपणा करत आगारप्रमुख रजेवर असल्याचे सांगितले. आगारप्रमुख रजेवर असल्याने स्थानकप्रमुख एस. एस. वड्डे यांना मुणगे येथे पाठविले. वड्डे यांनी त्या चालकाची चुकी असून त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर तब्बल तीन तासांनी चालकाने माफी मागितल्यानंतर रोखून धरलेली बस ग्रामस्थांनी सोडून दिली. यावेळी ग्रामस्थांनी कोणताही अनुचीत प्रकार केला नाही. या घटनेची तक्रार संबंधित प्रवाशाने देवगड आगारप्रमुख यांच्याकडे दिली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, गोविंद सावंत, दिगंबर पेडणेकर, विश्वास मुणगेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)चालकाचा उद्धटपणा : आगारप्रमुख रजेवर मालवण-देवगड ही बस मुणगे येथे मालवण येथून सकाळी ९.१0 वाजता आली. त्यावेळी भगवती मंदिर येथे ही बस ग्रामस्थांनी रोखून धरत चालकास मारहाणीबाबत जाब विचारला. तसेच देवगडचे आगारप्रमुख मुणगे येथे येतील त्याचवेळी बस सोडण्यात येईल असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तरी सुध्दा चालकाने उद्धटपणा करत आगारप्रमुख रजेवर असल्याचे सांगितले.