शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पोस्टमनच्या वाट्याला आव्हानांचे ओझे

By admin | Updated: May 20, 2015 00:12 IST

नव्या काळातील दूत : अनेक वर्षांचा दोस्त, सुख दु:खातील सोबती संकटात

खेड : लोकजीवनाचा अविभाज्य घटक असलेला पोस्टमन काळाच्या ओघात मागे पडत चालला आहे. त्याच्यापुढे अनेक आव्हानांचे ओझे निर्माण झाले आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींचे आदान-प्रदान करणारे म्हणून त्यांची ओळख अनन्यसाधारण आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी असलेला चाकरमानी पत्राव्दारे आपल्या खुशालीची माहिती कळवित असे़ तसेच कुटुंबासाठी मनीआॅर्डर देखील करीत असे़ याच मनीआॅर्डरवर त्याच्या कुटुंबाचा घरखर्च चालत असे़ एखादा गंभीररित्या आजारी पडलेल्या किंवा निधन झालेल्या चाकरमान्याची किंवा त्याच्या कुटुंबाकडून तार (टेलिग्रॅम) पाठविली जात असे़ यामुळे संबंधित कुटुंबातील व्यक्तींना याद्वारे माहिती मिळत होती. काही वेळा कुटुंबातील व्यक्तींना तार किंवा पत्र वाचता येत नसेल तर संबंधित पोस्टमनला ते वाचून दाखविण्याची गळ घातली जायची़ अशावेळी पोस्टमन देखील ते वाचून दाखवित असे़ सध्याच्या मोबाईल, इंटरनेट आणि संगणकाच्या युगामध्ये पत्रे, तार व मनीआॅर्डर जवळपास इतिहासजमा झाली आहे़ आता एस्एमएस आणि व्हॉटसअपने तर सार्वजनिक जीवनात मजबुत बस्तान बांधल्याने पोस्टमन या शब्दाचेच विस्मरण झाले आहे़ एरवी ग्रामीण भागामध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या पोस्टमनचे आधुनिक तंत्रज्ञानामुळे महत्व कमी झाले आहे़ असे सअने तरीही आजही काही निवडक अतर्देशीय पत्रे, राखी पौर्णिमेलाा परदेशात बाहेरगावी असलेल्या बहिणी आपल्या भावाला पोस्टातील पाकिटाद्वारेच राख्या पाठवित. हे प्रमाण मात्र खुपच कमी आहे़ मनीआर्डर आणि शासकिय पेन्शन आजही काही प्रमाणात पोस्टाद्वारेच पोेहोच होते़ याकरीता ग्रामीण भागामध्ये पोस्टमन आणि पोस्टमास्तर काम करीत आहेत़ हे काम कमी आहे़ शिवाय कर्मचा-यांचे काम कमी झाल्याने त्यांना कायमस्वरूपी सामावुन घेणे केंद्राला अशक्य होते़ अनेकवेळा केंद्राच्या काही नव्याने असलेल्या योजनांचा अंमल करण्याचे आदेश याच पोस्टमनना दिले जातात़ त्याच वेतनात हे कर्मचारी काम करीत आहेत़ या विविध कारणांनी अनेकवेळा या कर्मचा-यांनी संप पुकारला होता़ तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ अखेर आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता़ कमी काम आणि कमी दाम यांमुळे अगोदरच बेजार झालेला हा पोस्टमन विविध आधुनिक तंत्रज्ञानामुळे भरपुर मेहनत घेणारा पोस्टमन हळुहळू इतिहासजमा होऊ लागला आहे की काय असा प्रश्न पडत आहे. (प्रतिनिधी)