शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचा बहाणा करून बांधकाम व्यावसायिकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:13 IST

सावंतवाडी येथील बांधकाम व्यावसायिक अजय गोंधळे यांना पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे.

आंबोली : सावंतवाडी येथील बांधकाम व्यावसायिक अजय गोंधळे यांना पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यासह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी लुटून पलायन केले. हा प्रकार बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नाना पाणीजवळ घडला आहे. तत्पूर्वी डंपरच्या माध्यमातून त्यांनी गोंधावळे यांच्या गाडीला अपघात केला व याबाबत विचारणा करण्यासाठी गोंदावळे गेले असता त्यांनी त्यांना लुटले. कालच आंबोली येथे लुटण्याचा घडलेला प्रकार ताजा असतानाच पुन्हा प्रकार घडल्यामुळे आंबोली घाटातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबतची तक्रार देण्यासाठी गोंदावळे  यांनी येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. झालेला प्रकार असा गोंदावले हे आपल्या घरातील नातेवाईकांसह पुणे ते फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना आंबोली येथे नाना पाणी वळणावर एक अपघात झाला होता. ट्राफिक जाम झाले होते त्यामुळे गोंदावले  यांनी आपली गाडी थांबवली अपघाताची माहीती घेत असताना मागून भरधाव येणार्‍या एका कर्नाटक पासिंग डंपरने त्यांच्या कालला मागून धडक दिली. अपघाताचा आवाज येताच गोंदावले यांनी त्याना विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी त्यातील दोघांनी त्यांच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला व अन्य तिघांनी त्यांच्या गळ्यात हातात असलेले सोन्याचे दागिने खेचून घेतले व डंपर चालू करून तेथून पलायन केले.यावेळी गोंदावले हे कुटुंबासमवेत असल्यामुळे तसेच परिसरात रेंज नसल्यामुळे. तेथे फोन करू शकले नाही अखेर त्यांनी आत्ताच सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे त्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान सांयकाळी उशिरा स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यानी पदाधिकारी व कार्यकर्ते याच्यासह पोलीस ठाण्यात धाव घेतली व आरोपीचा तातडीने शोध घ्या अशी मागणी केली.