शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

नगरपंचायतीसाठी मोर्चेबांधणी करा

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

विनायक राऊत : दोडामार्ग येथील बैठकीत शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहन

कसई दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायत भाजप-सेना-आरपीआय युती करून लढणार आहोत. नगरपंचायतीवर भगवा फडकावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. सत्ता आल्यास नगरपंचायतीमधून दोडामार्ग शहराचा विकास होईल. जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचा विषय होता. यावेळी तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, संजय गवस, संजय देसाई, प्रदीप नाईक, पांडुरंग नाईक, सज्जन धाऊसकर आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, नगरपंचायतीची निवडणूक युती करून लढवावी, हा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निर्णय असल्याने भाजप-शिवसेना-आरपीआय अशी युती करून लढणार आहोत. राष्ट्रवादी-काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी युती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सातबारा उतारा त्वरित देणे महसूल विभागाचे काम आहे. मात्र, आज-उद्या करून तहसीलदार खेपा मारायला लावत असतील, तर ते योग्य नाही. अशा मनमानी अधिकाऱ्याची बदली व्हावी, या मागणीसाठी धुरी यांनी आंदोलन केले होते. ते योग्य आहे. धुरी यांना पक्षाचा व माझा पूर्ण पाठिंबा आहे. ग्रामस्थांना एलईडी बल्ब देण्यात येत आहेत. हे बल्ब वापरल्याने विजेची बचत होते. यानंतर पंखेही देण्यात येणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार, बचतगटांसाठी योजना आणल्या आहेत. पंतप्रधान कौशल्य विकास निधी ही योजना जिल्ह्यासाठी मंजूर केली आहे. तसेच कळणे मायनिंग बंद करण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले होते. मात्र, ते त्वरित बंद करणे शक्य नाही. परंतु ते बंद होणार. सर्व अवैध धंदेही बंद करण्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी दिले. (वार्ताहर)