शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना मिळणार हक्काच्या इमारती

By admin | Updated: April 16, 2015 00:02 IST

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला शासनाकडून उपलब्ध

रत्नागिरी : जिल्ह्यातील १७ अंगणवाड्यांच्या इमारतींच्या कामांना मंजुरी मिळाल्याने या अंगणवाड्यांना आता स्वत:च्या मालकीच्या हक्काच्या इमारती मिळणार आहेत, अशी माहिती प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जे. एस. शेख यांनी दिली. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १३६५ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाजमंदिरात भरवण्यात येतात़ या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास तयार आहे़ मात्र, अंगणवाड्या बांधकामासाठी ग्रामीण भागामध्ये जमीनमालक जागा देण्यास तयार होत नसल्याने इमारती कशा बांधणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला शासनाकडून उपलब्ध झाला आहे. त्यापैकी सन २०१३-१४ या वित्तीय वर्षामधील अंगणवाडी इमारती बांधकामांना ७८ लाख रुपये इतका निधी मंजूर आहे. उर्वरित रक्कम रुपये २ कोटी ७२ कोटी मधून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ४४ अंगणवाडी इमारत बांधकामांना सप्टेंबर, २०१४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी १७ परिपूर्ण अंगणवाडी इमारत बांधकाम प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रत्येक इमारतीसाठी ६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती नव्हत्या. मात्र, आता या इमारतींची ग्रामपंचायत स्तरावर ई-टेंडरिंग काढून लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये या अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या हक्काच्या इमारती मिळणारे आहेत. (शहर वार्ताहर)