ओरोस : राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले. या स्पर्धेच्या अंतिम यादीत ६४ मुलांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत निवड झाली आहे. यात १४ वर्षांखालील मुलींमध्ये स्वप्नाली वायदांडे, ऐश्वर्या धुरी, वैष्णवी थोरात, मैथिली पाटील, स्नेहल पाटोळे, वृत्तिका चाटी, दीप्ती जाधव, सानिका शेख, राजेश्वरी बनसोडे, साक्षी चौधरी, हिमानी देवराज, साक्षी प्रधान, साक्षी शेट्टी, ईशा पाटकर, अंकिता शेळके, अमिषा पाटील यांची अंतिम यादीत निवड झाली व प्रतिक्षा यादीत सानुजा खेर, प्राची पांढरे, करिष्मा कुडाचे, पल्लवी खरात यांची निवड झाली.१४ वर्षांखालील मुलांमध्ये राजकुमार जमदाडे, ओंकार यादव, शिवप्रसाद देवकर, ओंकार येसगुडे, श्रीपाद नाईक, रफिक सय्यद, शुभम ताकमोगे, वेदांत यादव, गणेश धनावडे, धीरज बावीस्कर, महेंद्र सोनगिरे, चेतन बोटकुळे, सुशांत मेंढे, अमोल तिडके, रोहित सहारे, अमय कोळी यांची अंतिम यादीत निवड झाली असून प्रतिक्षा यादीवर मंदार ढवळे, अनिल धोत्रे, अमित सिंग, अमित चोरमोल, सौरभ गजभिये यांची निवड झाली.१७ वर्षांखालील मुलींमध्ये प्रतिक्षा कांबळे, अश्विनी वळे, स्वप्ना फुलवटे, रसिका शेटके, स्वरांजली महाडीक, रेवती काशिद, भक्ती माने, ऋतुजा मराळे, स्नेहा दिवेकर, मयुरी ठाकरे, आकांक्षा मोरे, अर्पिता देशपांडे, निकिता लुटे, शितल खरात, अंकिता पवार, कामिनी कोल्हे यांची अंतिम यादीत निवड झाली आहे.सॉफ्टबॉल स्पर्धेतील प्रतिक्षा यादीवर समृद्धी मुळे, शिवानी लोके, समृद्धी सरताबे, दीक्षा सूर्यवंशी, आयुषी चौराशी यांची निवड झाली आहे. १७ वर्षांखालील मुलांमध्ये गौरक्ष चौधरी, श्रीराम चव्हाण, सागर बोरसे, निलेश जावरे, सिद्धेश ठोंबरे, स्वप्नील गदादे, तुषार पाटील, शुभम सुतार, असित तोडकरी, अलिम राजवाणी, सूरज सांगेले, अमसिंग लोंगे, उद्धव पाटील, आदर्श बागडे, कार्तिक आरडे, अथर्व दीक्षित यांची अंतिम निवड केली. (वार्ताहर)
राष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल करा
By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST