शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ समारंभावर ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार : वारंग

By admin | Updated: August 12, 2014 23:12 IST

प्रशासनाकडून विलंब,कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामत रकमा परत मिळालेल्या नाहीत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला पर्यावरण विकासरत्न पुरस्कारामध्ये राज्यात प्रथम आणण्यात मोलाचा वाटा ग्रामसेवकांचा आहे. मात्र, ग्रामसेवक संवर्गातील सेवाविषयक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विकासरत्न पुरस्कार समारंभावर ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार घातला आहे, असे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वारंग व सचिव सुनिल पांगम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.गेले ६ महिने रखडलेली विस्तार अधिकारीपदांची पदोन्नतीची फाईल विलंबाच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकली होती. आता पुन्हा विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये ही फाईल रखडविण्याचा प्रशासनाचा विचार आहे. अशाच विलंबामुळे कोकण विभागात सेवाज्येष्ठतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तार अधिकारी मागे पडले आहेत. ग्रामसेवकांच्या बदलीचे प्रस्ताव अद्याप आयुक्तांकडे सादर झालेले नाहीत. ग्रामसेवक पावरा यांना न्यायालयाने दोषमुक्त केले असूनही गेले सहा महिने त्यांना सेवेत पुन:स्थापित केलेले नाही. तसेच अन्य चार निलंबित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांची पदस्थापना रखडली आहे.सन २०१४-१५ चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार अद्याप मंजूर झालेले नाहीत. तसेच अनिल कांबळी या मृत ग्रामसेवकावर अन्यायकारक नियमबाह्य १०० टक्के आर्थिक जबाबदारी निश्चित करून त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करण्यात आला आहे. बदली झालेल्या ग्रामसेवकांची नियमबाह्य एलपीसी रोखून उपासमारी व सेवा पुस्तके रोखून ग्रामसेवकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे.तीन वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण होऊनही ग्रामसेवकांना सेवेत नियमित करण्यास प्रशासनाकडून विलंब केला जात आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामत रकमा परत मिळालेल्या नाहीत. यासह अन्य अनेक मागण्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने व ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत प्रशासन संवेदनशील नसल्याने जिल्ह्यातील एकही ग्रामसेवक पुणे येथे १४ आॅगस्टला होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाला जाणार नसल्याचे संघटनेच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)