शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींसाठी तळकट वनबागेची चाचपणी

By admin | Updated: April 22, 2015 00:31 IST

लवकरच करणार पाहणी : उपवनसंरक्षकांचा दुजोरा

सावंतवाडी : आंबेरीत ठेवण्यात आलेल्या हत्तींमधील एका हत्तीचा मृत्यू झाल्याने वनविभाग अन्य दोन हत्तींना कुठे हलवायचे या विवंचनेत असून, सोमवारी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी तळकट वनबागेत दोन हत्ती ठेवण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. तळकट वनबागेत वनविभागाची पुरेशी जागा असून, तेथे छोटेसे धरण बांधण्यास सोपे जाईल, असे ते म्हणाले. जर जागेबाबत अंतिम निर्णय झाला, तर त्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.आंबेरीत ठेवण्यात आलेल्या तीन हत्तींपैकी गणेश या हत्तीचा मागील आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आंबेरीतील जागा पुरेशी नाही. हत्तींना वेळेवर पाणी मिळत नाही. तसेच उन्हाचा तडाखा, आदी प्रश्नांमुळे हत्तींना सोयीस्कर ठिकाणी कसे हलवता येईल, याबाबत वनविभाग चाचपणी करीत असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिलारी व तळकट या जागेबाबत विचार सुरू केला आहे.तिलारी येथे ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हत्ती तेथे हलवणे सध्या तरी शक्य नाही. उलट तळकट येथे वनविभागाची दीडशे ते दोनशे एकर जमीन आहे. या ठिकाणी मोठे क्रॉल उभारून हत्तींना ठेवणे शक्य आहे. तसेच हत्तींसाठी छोटेसे धरणही उभारण्यासाठी पुरेसे पाणी आहे. या सर्व गोेष्टींमुळे वनविभाग तळकट वनबागेचा विचार करीत आहे. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनीही याला दुजोरा देत या जागेची आम्ही पाहणी करणार असून, जागा योग्य वाटल्यास तातडीने शासनाला प्रस्ताव देऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)हत्ती १५ मेपर्यंत क्रॉल बाहेरआंबेरी येथे ठेवण्यात आलेल्या दोन हत्तींना १५ मेपर्यंत क्रॉलबाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून, डॉ. उमाशंकर यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे यावेळी एस. रमेशकुमार यांनी स्पष्ट केले.