शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

ओहोळात दोघे वाहून गेले

By admin | Updated: July 10, 2017 00:43 IST

ओहोळात दोघे वाहून गेले

लोकमत न्यूज नेटवर्कचौके : धामापूर कासारटाका येथे धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या अणाव (सुकळवाड) येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. जेवण आटोपून ओहोळात हात धुण्यासाठी ते गेले असता अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे कर्मचारी वाहून गेल्याची घटना घडली. यात सुदाम आप्पा देऊलकरने झाडाच्या वेलीचा आधार घेतल्याने तो बालंबाल बचावला, तर त्याच्यासोबत वाहून गेलेला सोमनाथ दिगंबर पाटकर (वय ३०, रा. अणाव-दाभाचीवाडी) हा बेपत्ता झाला असून, जिल्हा प्रशासन, स्थानिक नागरिक, स्कुबा डायव्हर यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र, सोमनाथ याचा शोध लागला नव्हता. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.धार्मिक पर्यटनासाठी कासारटाका येथे अणाव इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे सुमारे दहा ते बारा कर्मचारी रविवारी सकाळी आले होते. दुपारचे जेवण बनविण्याची तयारी सुरू होती. यावेळी ओहोळाच्या पाण्यात हात धुण्यासाठी ते उतरले होते. शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ओहोळाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने सोमनाथ पाटकर व सुदाम देऊलकर हे दोघेही वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाबरोबर दोघेही कासारटाका येथून धामापूर-आंबेरीच्या दिशेने वाहून गेले. यात सुदाम देऊलकर याने एका झाडाच्या वेलीचा आधार घेत किनारा गाठला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. या दुर्घटनेनंतर महाविद्यालयाचे कर्मचारी सुन्न झाले होते.प्रशासनाची धावया घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका, पोलीस, तहसील प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मालवण येथील रेहान स्कुबा डायव्हिंगच्या डायव्हर यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू ठेवली. पाण्याच्या प्रवाहाची दिशा आंबेरीच्या दिशेने असल्याने आंबेरीच्या दिशेने शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार शरद गोसावी, मंडळ अधिकारी कर्पे, तलाठी जे. आर. परब, आंबेरी सरपंच उदय केळुसकर, चौके सरपंच राजा गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. रेहान स्कुबा डायव्हिंगचे जितेंद्र मेस्त्री, योगेश मेस्त्री, अकिल खान, अभिजित शिगले, केशव साठे यांनी शोधकार्य राबविले.