शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

किनारा स्वच्छता अभियान

By admin | Updated: January 20, 2017 23:02 IST

उदय चौधरींची माहिती : २४ जानेवारीला जिल्ह्यातील ३४ समुद्र ठिकाणांची निवड

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ११ पर्यंत जिल्ह्यातील ३४ समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून पुढील प्रत्येक महिन्याला या समुद्र किनाऱ्यावर प्रशासनाच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस श्रमदानासाठी सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा पाणी व स्वच्छता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने ही स्वच्छता मोहीम म्हणजे एक सुरूवात असून संबंधित ग्रामपंचायती, माध्यमिक व प्राथमिक शाळांचे विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत या सागर किनाऱ्यांची उत्स्फूर्तपणे वारंवार स्वच्छता होणे अपेक्षीत आहे. मागच्यावर्षी झालेल्या किनारा स्वच्छतेच्या दोन अभियानांमध्ये सुमारे १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावर्षीही अशा मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहभागासह अभियान राबविण्याची अपेक्षा आहे.मेरी टाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानांतर्गत २२ सागर किनारा असलेल्या ग्रामपंचायतींना निधीही दिला आहे. या अभियानात ‘सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धा’ समाविष्ट आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छतेचा मान सिंधुदुर्गने मिळविलेला असतानाच या सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धेतही सिंधुदुर्ग अव्वल राहील यादृष्टीने हे स्वच्छता अभियान राबवायचे आहे.जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक दिवसातील तीन तास स्वच्छतेसाठी द्यावेत. यासाठी त्या कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस कामकाजातून सूट देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. २४ जानेवारी होणाऱ्या या स्वच्छता अभियानात जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. (प्रतिनिधी)गतवर्षी मिळालेला उत्तम प्रतिसादसंपूर्ण भारतात प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारा स्वच्छता हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय होता. याच अनुषंगाने मागील वर्षापासून सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे असे सांगून चौधरी म्हणाले की, मागील वर्षी ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक, रबरी वस्तू असा मिळून १६०० गोणी कचरा हा जैविक विघटन होणारा होता तर १ हजार गोण्या यात प्लास्टीक, रबरी वस्तू, काचा यांचा समावेश होता. हा सर्व कचरा वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला होता. यावर्षी मात्र केवळ ओला व सुका कचरा सोडून उर्वरित जसे प्लास्टीक, काचा, धातूच्या वस्तू हाच कचरा गोळा करण्यात येणार आहे.