शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडेत वाहतुकीच्या कोंडीची ‘कोंडी’ फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:45 IST

नियोजनच नाही : शिस्त लावण्याची गरज; वाहनचालक त्रस्त

रामचंद्र पाटील-- बांबवडे (ता. शाहूवाडी) या तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला नियोजनाअभावी वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असून, सर्व स्थरावर प्रयत्न करून बाजाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे.बांबवडे हे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वसलेले असून, येथील आठवडी बाजार गुरुवारीच भरतो. या मार्गालगतच मुख्य बाजारपेठ आहे. या आठवडी बाजारामध्ये शाहूवाडीसह पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील व्यापारी लोक येतात. तसेच महामार्गावर प्रवास करणारे प्रवासीही खरेदीसाठी थांबत असल्याने बाजारपेठेत गर्दी झालेली असते.मुख्य बाजार हा बसस्थानक परिसरात भरतो. येथूनच महामार्गावर जाता येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान-मोठी वाहने उभी असतात. दर पाच मिनिटाला एक ते दोन बस येथे थांबलेल्या असतात. त्यांच्या थांबण्याचे योग्य नियोजन नसते. दोन्ही बाजूला एक-दोन एस.टी. बसेस जरी थांबल्या तरीही वाहतुकीची कोंडी होते. यासाठी जाणाऱ्या गाड्या बसस्थानकाच्या बाजूला, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या विरुद्ध बाजूला उभ्या राहण्यासाठी मलकापूर आगाराच्या स्वतंत्र कर्मचाऱ्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन लावणे गरजेचे आहे.खासगी वाहतूक करणारी शेकडो वाहने याच परिसरात उभी राहिलेली असतात. यामुळे वाहतुकीची खरी कोंडी होते. आठवडी बाजारादिवशी ही वाहने या परिसरापासून दूर उभी राहण्याची व्यवस्था केली तर कोंडी सुटण्याची शक्यता आहे. परंतु, हे नियोजन लावण्याचे धारिष्ट बांबवडे पोलिसांत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. येथेच भरणारा भाजीपाला मार्केट या परिसरातून वेगळ्या ठिकाणी भरविणे गरजेचे आहे. भाजीपाला मार्केट थोडेसे एका बाजूस तरी भरते; परंतु फळविक्रेते अगदी रस्त्यावरच फळांचे गाडे व ठेले मांडून बिनधास्त बसलेले असतात. अशीच परिस्थिती पिशवी येथील रोडवरही होते. तेथेही नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तरी जनावरांच्या बाजाराशेजारी जे मार्केटचे गाळे आहेत तेथे बाजार भरणे गरजेचे आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नोकरदार वर्ग कामावरून आल्यावर प्रत्येकाचे वाहन जागा मिळेल तेथे पार्किंग होते. या वेळेत वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतूक व बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही वाहतुकीची कोंडी होते.ऊस, बॉक्साईट वाहतूकसध्या ऊस आणि बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही कोंडीत भर पडत आहे.आठवडा बाजारादिवशी तर येथे चालणेही मुश्कील होते.