शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

‘त्या’ कायद्याने विकासाला खीळ

By admin | Updated: January 20, 2015 00:03 IST

पर्यावरणमंत्र्यांची भेट : आमदारांसह मालवणच्या उपनगराध्यक्षांनी वेधले लक्ष

मालवण : गेल्या चार वर्षांपासून शासनाच्या पर्यावरण खात्याने सीव्हीसीई (क्रिटीकल हॉर्नेबल कोस्टल एरिया) कायद्याची अंमलबजावणी केल्याने मालवणमधील किनारपट्टी भागात नवीन बांधकामांना सोडाच, परंतु घर दुरुस्तीच्या कामांनाही परवानगी मिळत नसल्याने पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या मालवण शहराला खीळ बसण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत आमदार वैभव नाईक आणि मालवण उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे लक्ष वेधले.पर्यावरण खात्याच्या या नवीन कायद्याचा फटका वेंगुर्ल्यापासून रत्नागिरीपर्यंतच्या किनारपट्टी भागाला बसला आहे. मालवण शहर तसेच वेंगुर्ला ते रत्नागिरीपर्यंतचा किनारपट्टी भाग हा सीव्हीसीईमध्ये मोडत आहे.या कायद्यामुळे विकास प्रक्रियेला बसलेली खीळ लक्षात घेऊन मालवण-कुडाळचे आमदार वैभव नाईक आणि मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेतली.केंद्राच्या सीआरझेड कायद्याचा फटका किनारपट्टी भागाला बसला असतानाच ६ जानेवारी २०११ च्या शासकीय अधिसूचनेद्वारे क्रिटीकल हॉर्नेबल कोस्टल एरिया या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यात वेंगुर्ल्यापासून रत्नागिरीपर्यंतच्या किनारपट्टी भागाचा अंतर्भाव करण्यात आला. यात मालवण शहराचा सुमारे ७० टक्के भाग मोडत असल्याची माहिती मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी देऊन या सीव्हीसीई कायद्याच्या निर्बंधामुळे नवीन बांधकामांना तसेच घर दुरुस्तीलाही परवानगी मिळेनाशी झाली आहे. जर नवीन बांधकामांना किंवा घर दुरुस्तीला परवानगी मिळवायची असेल, तर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी (एमसीझेडएमए)कडे प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे, असे जावकर म्हणाले.त्यानुसार ‘एमसीझेडएमए’कडे गेल्या चार वर्षांत तेरा प्रस्ताव दाखल करण्यात आले. मात्र, मालवण नगरपालिकेच्या अग्निशामक इमारतीव्यतिरिक्त एमसीझेडएमएने अद्याप इतर बांधकामांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मालवण शहराच्या विकास प्रक्रियेला खीळ बसली आहे या संदर्भात मालवण-कुडाळचे आमदार वैभव नाईक आणि माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक महेश जावकर यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी त्यांचे लक्ष वेधले. त्यावर मंत्री कदम यांनी याबाबत शिथिलता आणण्यासाठी काय करता येईल याविषयी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक बोलावून चर्चा करू व गरज भासल्यास केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊ, अशी ग्वाही दिली आहे. (प्रतिनिधी)पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासनया कायद्यांमुळे किनारपट्टी भागाला बसलेल्या फटक्याची कल्पना दिली असता मंत्री रामदास कदम यांनी याबाबत आपण जातीने लक्ष घालू व या कायद्याची शिथिलता करण्यासाठी काय करता येईल, या संदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊ. गरज भासल्यास केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.