शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

तळकोकणातही ‘किटली’तील दुधाला फुटली उकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:37 IST

सिंधुदुर्गनगरी : गुजरात, गोवा व कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर दुधाला प्रति लीटर आठ रुपये अनुदान देण्यात यावे, दुधाळ जनावरे खरेदीसाठी ९० टक्के अनुदान मिळाले, दूध वाहतूक खर्चासाठी अनुदान देण्यात यावे यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाभरातील दुग्ध उत्पादक शेतकरी एकवटले. आपल्या न्याय मागण्यांसाठी ओरोस येथील रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी भवनावर काढण्यात ...

सिंधुदुर्गनगरी : गुजरात, गोवा व कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर दुधाला प्रति लीटर आठ रुपये अनुदान देण्यात यावे, दुधाळ जनावरे खरेदीसाठी ९० टक्के अनुदान मिळाले, दूध वाहतूक खर्चासाठी अनुदान देण्यात यावे यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाभरातील दुग्ध उत्पादक शेतकरी एकवटले. आपल्या न्याय मागण्यांसाठी ओरोस येथील रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन किटली आंदोलन यशस्वी केले. शासनविरोधी घोषणाबाजीने शेतकºयांनी सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडली.दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासह अन्य नऊ मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी किटली आंदोलन छेडण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेतकरी ओरोस येथील रवळनाथ मंदिराजवळ जमा होत होते.आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते ओरोसचे ग्रामदैवत श्री रवळनाथाचरणी दुधाचा अभिषेक घालून व गोमातेचे पूजन करून हजारो शेतकºयांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० च्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, संग्राम प्रभुगांवकर, अतुल काळसेकर, एकनाथ नाडकर्णी, संदेश सावंत, विकास कुडाळकर, अंकुश जाधव, दिलीप रावराणे, मनिष परब, प्रमोद कामत, सुभाष दळवी, गुरुनाथ पेडणेकर, दादा साईल, प्रमोद परब, चंद्रकांत परब, अस्मिता बांदेकर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले होते.सकाळी ११.३० वाजता किटली आंदोलनास खºया अर्थाने सुरुवात झाली. ओरोस रवळनाथ मंदिर येथून असंख्य शेतकºयांचा निघालेला मोर्चा शासनविरोधी अनेक घोषणा देत १२.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. प्रत्येक शेतकºयाच्या हातात किटली दिसून येत होती. मोर्चाच्या मध्यभागी गायींचा समावेश होता. शासनाप्रती शेतकºयांच्या मनात असणारा असंतोष यावेळी दिसून येत होता.हा मोर्चा दुपारी १२.१५ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित हजारो शेतकºयांना संबोधित करीत सरकारवर निशाणा साधला.एकीकडे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात दूध उत्पादकांना थेट पाच रुपये अनुदानासाठी सुरू असलेल्या आंदोलनास गालबोट लागले असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आलेले किटली आंदोलन मात्र लोकशाहीच्या मार्गाने पार पडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यातील शेतकºयांनी या आंदोलनास कोणतेही गालबोट न लावता अगदी सनदशीरव लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन छेडले.यावेळी जिल्हाधिकारी भवनात दुधाचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कामानिमित्त फिरतीवर गेल्याने त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या टेबलवर दुधाच्या किटल्या ठेवल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी शेतकºयांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी व आमदार राणे यांनी विजय जोशी व दुग्धविकास अधिकारी प्रकाश आवटे यांना दुधाचे वाटप केले.‘दूध उत्पादक शेतकºयांच्या एकजुटीचा विजय असो, सत्ताधारी तुपाशी मग शेतकरी का उपाशी?, दुधाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे, दूध का दूध आणि पाण्याचे पाणी झालेच पाहिजे’ आदी विविध गगनभेदी घोषणा देऊन शेतकºयांनी येथील परिसर दणाणून सोडला.