शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मृतदेह निघाले, ढिगारे शिल्लक

By admin | Updated: June 25, 2015 23:03 IST

आता आठवणीचे ढिगारे....

शिवाजी गोरे  दापोलीदाभोळ टेमकरवाडीतील दुर्घटना ग्रामस्थ अजूनही विसरले नसून ती काळरात्र अजूनही त्यांच्या अंत:करणात खोलवर रुजली असून नुसती आठवण काढली तरीही आमच्या जीवाचा थरकाप होतो. दुर्दैवी घटना घडून गेली. या घटनेत या वाडीने बरंच काही गमावलं आहे. या वाडीची झालेली जिवीतहानी पुन्हा भरुन निघणार नाही. चार रात्री या दुर्घटनेला होऊन गेल्या मात्र झोप काही येत नाही अजूनही ही वाडी रात्रीचा दिवस करुन जीवन जगत असून टेमकरवाडीवरचे भितीचे सावट दूर झालेले नाही. दाभोळ टेमकरवाडीची भौगोलीक रचना ही एका बाजूला उभा डोंगर तर पायथ्याशी अथांग दाभोळखाडी या दोन्हीच्या मध्यभागी दाभोळ गाव वसले आहे. या गावाची भौगोलिक रचना अतिशय सुंदर आहे. प्राचीन काळी वसलेल्या या गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. परंतु अलिकडे या गावावर निसर्गाचा कोप होऊ लागला आहे. २०१० मध्ये डोंगराची दरड कोसळून दोन घरांचे नुकसान, त्या पाठोपाठ नुकतीच घडलेली दुर्घटना यामुळे दाभोळ गावावर दु:खाचे सावट पसरले आहे. दाभोळ टेमकरवाडीत ३० कुटुंबाचे अधिवास आहे. प्रत्येकाच्या घरासमोर नारळ, सुपारी, आंबा, काजू, सागची झाडे आहेत. या वाडीचे रक्षण करण्यासाठी डोंगरात वाडीच्या डोक्यावर हनुमानाचे मंदीर आहे. महाडिक कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू लोकांच्या जिव्हारी लागला आहे. निसर्ग कोपला व डोंगर कोसळून दरडीखाली तीन घरे गाडली गेली. यामध्ये पाचजणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेतून सुदैवाने काही कुटुंबे बचावली. काळाच्या दाढेतून त्यांची सुटका झाली. एका घराला आंब्याच्या झाडानेच वाचविले. डोंगराची कोसळलेली माती आंब्याच्या झाडाने थोपवून धरल्याने त्या घरातील पाच जणांचा जीव वाचला. आता आठवणीचे ढिगारे.... टेमकरवाडीतील महाडिक कुटुुंबियांच्या घरासमोरील निसर्गरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न होत होते. परंतु रविवारी मध्यरात्री २.३० वाजता डोंगर कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे नंदनवन असणारे घर अंगणाच्या जागी केवळ आठवणीचे ढिगारेच शिल्लक राहिले आहेत. महाडिक यांच्या घरकाडे नजर टाकल्यावर त्या ठिकाणी भितीचे सावट व स्मशान शांतता दिसून येत आहे. कधी काळी गजबजलेल्या निसर्गरम्य परिसर आता स्मशानातील भेसूर शांततेसारखा वाटू लागला आहे. पुन्हा डोंगर खचण्याची भीती अजून कायम आहे.