शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

तळेखोल जाळपोळ; ३७ जणांवर गुन्हे

By admin | Updated: February 1, 2015 00:39 IST

सातजणांना अटक : देवस्थानच्या मानापमानावरून घटना

दोडामार्ग : तळेखोल येथे देवस्थानच्या मानापमानावरून दोन गटांत गेल्या अनेक वर्षांपासूनचा असलेला वाद काल, शुक्रवारी रात्री उफाळून आला. जत्रोत्सवातच दोन्ही गटांत तुुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. त्यात बाराजण जखमी झाले, तर सात गाड्यांची मोडतोड व दोन दुचाकीही जाळण्यात आल्या. दोन्ही गटांकडून दोडामार्ग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्हींकडील ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली असून, ३० जण फरार आहेत. गोव्याच्या सरहद्दीवर असलेल्या तळेखोल गावात गेल्या अनेक वर्षांपासून देवस्थानच्या वादातून दोन गटांत वाद आहेत. हा वाद काल रात्री श्री देवी सातेरी केळबायच्या जत्रोत्सवात उफाळून आला. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने तहसील कार्यालयात दोन्ही गटांतील मंडळींना बोलविण्यात आले होते. यावेळी तोडगा निघाला नाही. तहसीलदारांनी दळवी व गवस गटाला जत्रोत्सव साजरा करण्यास परवानगी देत सावंत व दळवी गटास त्या ठिकाणी जाण्यास मनाई आदेश केला होता. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास लाडू दळवी व गवस गटाने देवीची आरती व पालखी काढली असता त्याच दरम्यान विरोधी सावंत गटाने मंदिरात येऊन जत्रोत्सव साजरा करण्यास दळवी व गवस गटाला विरोध केला. यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची होत त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. लाकडी दांड्यांनी दोन्ही गटांतील माणसांनी एकमेकांना मारहाण केली. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या दुकानांचीही नासधूस करण्यात आली. तसेच दळवी व गवस गटाच्या सात गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. दोन दुचाक्या फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी आपल्या फोजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल होताच दोन्ही गटांतील दंगेखोरांनी मंदिर परिसरातून पळ काढला. जखमी झालेल्या दोन्ही गटांतील महिला व पुरुष मंडळींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी) मंदिराला आगीची झळ देवस्थानच्या वादातूनच मंदिरालाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. दुचाक्यांना आग लावल्यानंतर झालेल्या स्फोटाचा भडका उडून मंदिराच्या सभागृहाला आग लागली. पोलिसांनी तत्काळ ही आग विझविल्याने मंदिराचे नुकसान झाले नाही.