शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चुलत आजोबांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:17 IST

नातवाला अटक

राजापूर : जमिनीच्या वादातून नातवानेच चुलत आजोबांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील आंगले गावात घडली. अनाजी भानू राऊत (वय ७०) असे आजोबांचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी देवेंद्र बबन राऊत (२३) याला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र आणि अनाजी राऊत यांच्यामध्ये जमिनीवरून वाद होता. शुक्रवारी सकाळी अनाजी यांची पत्नी भागीरथी या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कामासाठी गेल्या होत्या. दुपारी ११ वाजता त्या घरी परत आल्या. त्यावेळी घरात पाऊल टाकताच समोरचे दृश्य पाहून त्या घाबरून गेल्या. तेथे अनाजी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. भागीरथी यांनी तत्काळ गावच्या सरपंच सुहानी राऊत व पोलिसपाटील सुप्रिया शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची खबर नोंदवून घेतल्यानंतर पोलिस घटनास्थळी उशिराने दाखल झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिस रुग्ण्वाहिकेसह गावात आले. त्यांनी जखमी अनाजी यांना राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र या दरम्यान बराच उशीर झाल्याने अनाजी यांना वाचविण्यात अपयश आले. पोलिसांनी आरोपी देवेंद्र याला तत्काळ अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गुन्हा करताना वापरलेली पहारही जप्त करण्यात आली आहे. राजापूरचे पोलिस उपनिरीक्षक सचिन काळे, श्रीमती फाळके, प्रसाद शिवलकर, चाटे, चव्हाण हे घटनास्थळी गेले होते.