शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील बगिराची वनखात्याकडून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 17:43 IST

जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ काळ्या बिबट्याचे (ब्लॅक पँथर) दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमी उत्साहीत. आंबा-बागेत असलेल्या सात ते आठ ते फुट खोल टाकीत आढळून आले होते हे ब्लॅक पँथरचे दिड ते दोन वर्षाचे पिल्लू. दरम्यान त्या पिल्लाला बाहेर काढून वनअधिकार्‍यांनी नैसगिक अधिवासात सोडले.

कुडाळ - सहयाद्री पट्ट्यात “ब्लॅक पॅथर” चा अधिवास असल्याचे काल, गुरूवारी अखेर उघड झाले आहे. तालुक्यातील गोवेरी गावात गुरूवारी दिड ते दोन वर्षाचे पिल्लू आढळून आले. ते पिल्लू परिसरात राहणार्‍या तुकाराम राऊळ यांच्या आंबा-बागेत असलेल्या सात ते आठ ते फुट खोल टाकीत आढळून आले. दरम्यान त्या पिल्लाला बाहेर काढून वनअधिकार्‍यांनी नैसगिक अधिवासात सोडले.

यावेळी उपवनसंरक्षक सावंतवाडी शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) आय. डी. जालगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अ. स. चव्हाण, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वाहनचालक राहुल मयेकर, स्थानिक ग्रामस्थ दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे आदी उपस्थित होते.

पाणाच्या टाकीत दोन दिवसांपासून बिबट्याचे पिल्लू पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याची पाहणी केली तेव्हा तो दुर्मीळ काळा बिबट्या असल्याचे लक्षात आले. या ब्लॅक पँथरला टाकीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. दुर्मीळ काळ्या बिबट्याचे हे पिल्लू नर असून ते साधारण एक ते सव्वा वर्षाचे आहे. सिंधुदुर्गातून प्रथमच काळ्या बिबट्याची सुटका करण्यात आली आहे. त्याची आईही जवळपास असण्याची शक्यता आहे. या ब्लॅक पँथरचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ देखील वनकर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केला आहे. कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेन्ट बेन यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ काळ्या बिबट्याचे (ब्लॅक पँथर) दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमी उत्साहीत झाले आहेत. कुडाळनजीकचा परिसर जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे इथं अनेक वन्य जीव वास्तव्यास आहेत. यामुळेच ब्लॅक पँथरचं दर्शन घडलं असावे, असे वन्यजीव प्रेमींना वाटत आहे.

ब्लॅक पँथर किंवा काळा बिबट्या

मेलॅनिस्टिक बिबट्यांना सामान्यतः ब्लॅक पँथर किंवा काळा बिबट्या म्हणतात. याला मोगली जमीन असेही म्हटले जाते. ब्लॅक पँथर पश्चिम घाट आणि ईशान्य भारताच्या जंगलात आढळतात. मेलेनिस्टिक बिबट्या कोकण प्रदेश, गोवा आणि कर्नाटकात आढळतात. त्यांच्या शरीरात जास्त मेलेनिन असते. त्यांच्या फरचा रंग निळा, काळा, राखाडी आणि जांभळ्या रंगाचे मिश्रण आहे.