शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

किनाऱ्यांवर काळ्या तेलाचे थर

By admin | Updated: August 25, 2014 22:12 IST

जैवविविधता धोक्यात : मत्स्योत्पादनावरही विपरीत परिणाम

संदीप बोडवे - मालवण --सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांची किनारपट्टी काळ््या तेलाच्या तवंगामुळे प्रदूषित झाली आहे. सागरी उधाण आणि भरतीच्यावेळी किनारपट्टीवर काळे तेल आणि त्या काळ््या तेलाचे गोळे जमा होऊ लागले आहेत. पर्यावरणास घातक असलेल्या काळ््या तेलाच्या तवंगामुळे सिंधुदुर्गची सागरी जैवविविधता धोक्यात येत असून शासनाने या संदर्भात प्रभावी धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे.मागील दोन वर्षे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवून किनाऱ्यांवरील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली. भारत सरकारने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) जीईएफ आदींच्या माध्यमातून हाती घेतलेल्या ‘सागरी जैवविविधतेचे संवर्धन, जतन आणि तिचा शाश्वत वापर’ या प्रकल्पाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेनंतर प्रकल्पकर्ते आणि शासनाकडून प्लास्टिक निर्मुलनासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र किनारपट्टीवर पसरत असलेल्या काळ््या तेलाच्या थरांमुळे सागरी प्रदूषणाचा प्रश्न अजूनही गंभीर राहिला आहे. काळ््या तेलाच्या तवंगामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील जैवविविधता झपाट्याने धोक्यात येत असताना जैवविविधतेसंदर्भातील प्रकल्पकर्त्यांनी तसेच शासनाने या प्रदूषणाकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही. यंदाच्या पावसाळ््यात देवबाग, तोंडवळी, आचरा, तळाशिल, मिठमुंबरी तसेच वायंगणीच्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग आढळून आले. तेलाच्या थरामुळे तसेच काळ््या व घट्ट गोळ््यांमुळे किनारे प्रदूषित झाले. खाडी किंवा समुद्रकिनारी पावसाळ््यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना याचा त्रास अधिक जाणवला. अनेकवेळा काळ््या तेलाच्या तवंगामुळे किनाऱ्याकडे येणारी मासळी कमी झाल्याची तक्रार मच्छिमारांनी नोंदवली. किनाऱ्यांवर पसरणारे तेल क्रुड आॅईल तसेच बोटींचे इंधन असल्याचे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले. बॉम्बे हाय येथे तेल निर्मिती क्षेत्र आहे. मुंबईजवळच मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी येथे मोठ्या मालवाहू बोटींच्या इंजिनांचे वंगण तेल बदलण्याचे काम केले जाते. बदललेले खराब तेल समुद्रात सोडण्यात येते. दरवर्षी पावसाळ््यात किनाऱ्यांवर प्लास्टिक कचरा, तुटलेली जाळी, शितपेयांचे डबे, खाद्यपदार्थांची वेस्टणे आदी कचरा वाहून येतो. यंदा या कचऱ्याबरोबरच तेलाचे गोळे वाहून आल्याने किनारपट्टी अस्वच्छ झाली.मच्छिमारांचे नुकसानपावसाळ््यात समुद्रात व खाड्यांमध्ये गळ टाकून, पागुन किंवा लहान जाळ््यांद्वारे किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. या मासेमारीमध्ये सोनम, कोकर, मोरी, वागळी, तांबोशी, पालू, शेंगटी आदी ठराविक प्रकारचे मासे पुरेशा प्रमाणात मिळतात. पावसाळ््यात तेलाच्या तवंगामुळे या माशांनी किनाऱ्यापासून दूर राहणे पसंद केल्याने मच्छिमारांचे नुकसान झाले आहे.- आनंद मालंडकर, ज्येष्ठ कासवमित्र, मालवणजीव साखळी धोक्यातऔद्योगिक क्षेत्रातील रसायन मिश्रीत सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. यामुळे सागरी जीव साखळी धोक्यात आली आहे. यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा सागरी प्रदुषण वाढत जाणार आहे आणि त्याचे विपरीत परिणाम आगामी काळात सर्र्वानाच भोगावे लागणार आहेत.- गंगाराम घाडी, अध्यक्ष, जिल्हा श्रमजिवी रापण संघकिनारा बनला तेलयुक्तमालवाहू बोटींच्या अपघातातूनही समुद्रात तेल गळती होते. ८ आॅगस्ट २०१० रोजी मुंबईजवळ मालवाहू बोटींची टक्कर झाल्याने हजारो लिटर तेलाची समुद्रात गळती झाली होती.याचा परिणाम म्हणून २०१० साली समुद्रातील मासे मरून किनाऱ्यांना लागत होते. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पावसाळ््यात काळे तेल व त्याचे गोळे वाहून आल्याने किनाऱ्यांवर तेलाचे थर पसरले होते.येथील चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर, निवती हे किनारे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्धीस येत आहेत. किनाऱ्यांवरील तेलाचे थर तसेच खडकांना तेलाचे तवंग चिकटल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तेलामुळे किनारे दूषित झाल्यास पावसाळी पर्यटनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.