शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे मिशन ‘बेनामी ठेकेदार मुक्त जिल्हा’

By admin | Updated: July 3, 2016 23:25 IST

काका कुडाळकर : विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे ; मालवण येथे निवडणूक आढावा बैठक

 मालवण : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये युती शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे करत स्थानिक सत्ताधाऱ्यांनी गैरकारभार केला आहे. भाजपच्या माध्यमातून गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असून बेनामी ठेकेदारांपासून जिल्हा मुक्त करण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांनी दिली. मालवण येथील भाजप कार्यालयात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकांबाबत आढावा बैठक काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुहास सावंत, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा चिटणीस आप्पा लुडबे, भाऊ सामंत, अविनाश पराडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, रविकिरण तोरसकर, महेश मांजरेकर, गोपी पालव, सर्फराज नाईक, गणेश कुशे, धोंडी चिंदरकर, संतोष गावकर, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर, कमलेश चव्हाण, विरेश पवार, शशिकांत शिंदे, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुका कायदेविषयक आघाडी प्रमुख पदी वकील हेमेंद्र गोवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. गोवेकर यांचा अनुभव व कायदेविषयक ज्ञानाचा पक्ष व कार्यकर्त्यांना निश्चितच उपयोग होईल, असे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले. तर शहर व तालुक्याची किनारपट्टी सीआरझेड क्षेत्रातील सीव्हीसीएमधून मुक्त करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दौरा लवकरच निश्चित केला जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पालिका निवडणुकीत परिवर्तन घटविणार पालिका निवडणुकीत भाजपाकडून सतराही जागावर निवडणूक लढवली जाणार आहे. तालुक्यातही तालुका भाजपकडून चांगले काम झाले आहे. पालिका निवडणुकीचा विचार करता विद्यमान सत्ताधारी काँग्रेसकडून सत्ता काढून घेण्याचे आमचे मिशन आहे. सध्या कार्यरत असलेल्या विशिष्ट गटाने शहरात अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे मालवणची जनता नवा पर्याय शोधत आहे. उत्तम पर्याय म्हणून भाजप सक्षम आहे. जनतेचा विश्वास संपादन करून जनताच मालवणचे नेतृत्व ठरवेल. या पालिका निवडणुकीत मालवणात परिवर्तन घडून येईल, असा विश्वास कुडाळकर यांनी व्यक्त केला.