शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकांत दळवी यांचा भाजप प्रवेश निश्चित?

By admin | Updated: January 11, 2017 23:07 IST

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट : दापोलीत शिवसेनेला खिंडार

दापोली : दापोलीच्या राजकारणात गेली २५ वर्षे निर्विवाद सत्ता गाजविणारे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात १९९० साली दळवी यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तेव्हापासून सलग २५ वर्षे आमदार म्हणून ते निवडून आले. रत्नागिरीतून सलग पाचवेळा निवडून जाणारे एकमेव आमदार दळवी यांचा षट्कार २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हुकला. आपला पराभव विरोधकांकडून नाही, तर स्वकीयांनीच गद्दारी केल्यामुळे झाला असल्याचा उल्लेख दळवी यांनी वारंवार केला होता.सहाव्यांदा निवडून आले असते तर दळवी यांना मंत्रिपद मिळाले असते. यामुळे हा पराभव त्यांच्या अधिकच जिव्हारी लागला. विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळण्याची आशा त्यांना होती, परंतु शिवसेनेकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. त्यामुळे गेले अनेक दिवस दळवी पक्षावर नाराज होते.निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी थेट पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाच जबाबदार धरले होते. लोकसभा निवडणुकीतही रामदास कदम यांनी पक्षाच्या विरोधात काम केले होते. मग ते निष्ठावंत कसे, असा सवालसुद्धा त्यांनी जाहीरपणे केला होता. रामदास कदम समर्थकांवरही त्यांनी थेट हल्लाबोल केला होता. दळवी यांना डावलून नगरपंचायत निवडणुकीचे सर्व अधिकार योगेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे सूत्र पुन्हा योगेश कदम यांच्याकडे सोपविण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याने दळवी अनेक दिवस अस्वस्थ होते.रामदास कदम यांच्यावर अलीकडेही दळवी यांनी सडकून टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृ त उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्या गद्दारांची संघटनेत पदावर वर्णी लागत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दळवी यांनी दिला होता. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांची पदावर वर्णी लागणे थांबले होते.या एकूणच वादाच्या पार्श्वभूमीवर दळवी यांनी आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपकडून त्यांचे लाल दिव्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.आजच्या या भेटीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)