शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पारंपरिकच्या पाठिशी

By admin | Updated: December 4, 2014 23:39 IST

अतुल काळसेकरांची माहिती : पारंपरिक, पर्ससीन मच्छिमारांमधील वाद

मालवण : पारंपरिक आणि पर्ससीनमधील वाद नवा नाही. परंतु यापूर्वी शासनाने म्हणा किंवा लोकप्रतिनिधींनी हा वाद मिटविला नाही. केवळ मतांच्या राजकारणासाठी मच्छिमारांचा वापर केला. त्याचाच फायदा मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेवून अनधिकृत मासेमारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करताना भाजपा पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत आणि बिगर परवाना बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई न केल्यास शासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही काळसेकर यांनी यावेळी दिला. मालवण येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, राजू राऊळ, जयदेव कदम, प्रभाकर सावंत, भाऊ सामंत, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काळसेकर म्हणाले, गेले चार दिवस सुरू असलेला सिंधुदुर्गातील मच्छिमारांचा संघर्ष अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे सिंधुदुर्गातील किनारपट्टी कधी नव्हे एवढी अशांत झाली आहे. पारंपरिक गिलनेट मच्छिमार आणि पर्ससीन मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमधील वाद नवा नाही. मात्र, सातत्याने या वादाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे.यापुढे सिंधुदुर्गच्या संपूर्ण किनारपट्टीवरील सर्वच मच्छिमार नौकांच्या परवाना आणि इतर कायदेशीर बाबींची तातडीने तपासणी करून अनधिकृत आणि बिगर परवाना बोटींवर मत्स्य विभागाने महसूल व पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई करावी. या कामात अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाल्यास अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येईल, असे काळसेकर म्हणाले. समुद्र हा कोणाच्या बापाचा नसला तरीही गेल्या अनेक पिढ्यांपासून मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्या त्या भागातील मच्छिमारांचा तो हक्क आहे. अशा हक्काच्या उदरनिर्वाहावर जर आधुनिकिकरणाच्या नावावर कुणी गदा आणत असेल तर अवैध पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बेकायदेशीर आधुनिक करणाला विरोध राहील. सिंधुदुर्गात शेकडो बोटींना परवाने नाहीत ही बाब गंभीर आहे. अशा बिगर परवाना बोटींचा एखाद्या गुन्ह्यासाठी किंवा देशविघातक कृत्यासाठी वापर केला जावू शकतो. ही बाब सिंधुदुर्ग प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या आतापर्यंत लक्षात कशी आली नाही? असा सवालही काळसेकर यांनी उपस्थित केला. निवती समुद्रात दगडफेकीचा प्रकार हा दोन्ही बाजु्च्या मच्छिमारांनी एकमेकांना आव्हान देण्यातून झाला. वृत्तपत्रातून आधी दोन दिवस असे आव्हान देण्याचे प्रकार सुरू असताना पोलीस आणि मत्स्य विभागाने याचे गांभिर्य ओळखले नाही आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असे काळसेकर म्हणाले.दरम्यान, निवती येथील पर्ससिनधारक मच्छिमारांनी गुरुवारी दुपारनंतर गेले दोन दिवस पोलीस ठाण्यासमोर छेडलेले ठिय्या आंदोलनही मागे घेतल्याने आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. प्रशासनानेदेखील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)निवतीतील मच्छिमारांचे आंदोलन स्थगित सोमवारी सायंकाळी पर्ससीननेट व पारंपरिक मच्छिमारीवरून मालवण व निवती मेढा येथील मच्छिमारामंमध्ये भर समुद्रात एकमेकांवर दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलीस हल्लेखोरांना अटक करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरु ठेवणार असा पवित्रा मच्छिमारांनी घेतला होता. मात्र, गुरुवारी दुपारनंतर मच्छिमारांनी हे आंदोलन स्थगित केले आहे. मालवण येथील दहा मच्छिमारांच्या विरोधात तसेच अन्य अज्ञात चारशे मच्छिमारांच्या विरोधात निवती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्यप्रकारे तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी दिली.सिंधुदुर्ग भाजपाच्यावतीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून भविष्यात असे प्रकार होवू नयेत म्हणून या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मासेमारी करून उदरनिर्वाह करण्याचा हक्क जरी असला तरीही कुणीही यासाठी कायदा हातात घेवू नये.- अतुल काळसेकर, भाजपा, जिल्हाध्यक्ष