शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्तविरोधी कार्यवाही केल्याने भाजपच्या कोअर कमिटीने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पुतळा दहनाच्या प्रकरणानंतर पक्षश्रेष्ठींनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्तविरोधी कार्यवाही केल्याने भाजपच्या कोअर कमिटीने त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पुतळा दहनाच्या प्रकरणानंतर पक्षश्रेष्ठींनी याबाबता निर्णय कोअरकमिटी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच भाजप कोअर कमिटीची बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि सतीश धोंड तसेच जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी मालवणच्या प्रश्नावर चर्चा झाली. मोंडकर यांनी केलेले वर्तन पक्षशिस्तीविरुद्ध असल्याचे एकमत झाले व त्यांच्यावर कारवाई करण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यानुसार मोंडकर यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून निलंबित करण्यात आल्याचे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलविजय केनवडेकर नवे तालुकाध्यक्षमोंडकर यांच्या वर्तनावर पांघरूण घातले असते तर तो निर्णय पक्षशिस्तीसाठी बाधक ठरला असता. त्यामुळे मोंडकर यांच्यावर कारवाई केल्याचे स्पष्ट करीत मंत्री चव्हाण यांनी मोंडकर यांच्या जागी तालुकाध्यक्षपदी केनवडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.पुतळा दहन खटकलेभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी तडकाफडकी बाबा मोंडकर यांच्या जागी विजय केनवडेकर यांची मालवण तालुकाध्यक्षपदी निवड केल्याने वाद उफाळला होता. त्यानंतर मोंडकर यांनी जठारांच्या विरोधात रान उठविले होते. जिल्हाध्यक्ष या नात्याने जठारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन केले होते. पुतळा दहनाची बाब भाजप पक्षश्रेष्ठींना जास्त खटकली होती.