शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इंदू मिलचा प्रश्न भाजपने सोडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:34 IST

भीमराव आंबेडकर : बौद्ध महासभेचे मुंबईत लवकरच देशव्यापी अधिवेशन

कुडाळ : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठीचा प्रश्न काँग्रेसच्या राज्यात सुटला नाही, तो भाजप सरकारने तत्काळ सोडवून मुंबई-इंदू मिल येथे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा केला आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. समाज बांधवांचे धार्मिक, सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता येत्या १६ व १७ मे रोजी भारतीय बौद्ध महासभेचे देशव्यापी अधिवेशन मुंबईत होणार असून, यापुढे संस्थेच्यावतीने राजकीय क्षेत्रातही बांधवांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. कुडाळ तालुक्यातील बाव व घावनळे येथील गावांमध्ये खासगी कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर यांनी १६ व १७ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या देशव्यापी महाअधिवेशनाबाबत येथील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी आंबेडकर म्हणाले, भारतीय बौद्ध महासभा ही धार्र्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था राजकीय पक्षविरहीत काम करते. यापुढे ही संस्था समाज बांधवांना राजकीय क्षेत्रातही मार्गदर्शन करेल. यावेळी भारतीय बौद्ध महासभा मुंबईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भिकाजी वर्दे, प्रभाकर जाधव, विलास वळंजू, महेश परूळेकर, व्ही. डी. जाधव, सोमा कुडाळकर, आर. डी. कदम, महेंद्र कदम, आनंद कासार्डेकर, पी. डी. माणगावकर, जनीकुमार कांबळे, चंद्रकांत कदम, सुदीप कांबळे, वि.रा. आसुलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाबासाहेबांच्या स्मारकाची सर्वांचीच इच्छा पूर्णबाबासाहेबांचे मुंबईत मोठे स्मारक व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. चैत्यभूमी येथील जागेत मोठे स्मारक होऊ शकत नाही. त्यामुळे इंदू मिलची जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु काँग्रेस सरकारच्या काळात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले हे स्मारक सध्याच्या सरकारने तत्काळ मंजूर केले. याचा आनंद आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर म्हणाले.जग जसजसे प्रगत होत आहे, तसतसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व वाढत असून मानवता आणि आदर्श समाज घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना वेगळा सन्मान आहे. भारतीय बौद्ध महासभा ही धार्र्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ही संस्था राजकीय पक्षविरहीत काम करते. यापुढे ही संस्था समाज बांधवांना राजकीय क्षेत्रातही मार्गदर्शन करेल.- भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा