शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी नगरपंचायतीत भाजपला ‘लॉटरी’

By admin | Updated: October 9, 2015 23:29 IST

प्रभाग क्रमांक सात बिनविरोध : काँग्रेस उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला लॉटरी लागली आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील काँग्रेसच्या उमेदवार मयुरी नाना तांबे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी अवैध ठरविले. त्यामुळे भाजपच्या सुप्रिया राजन तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक ७ हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रभागातून महायुतीतर्फे भाजपच्या सुप्रिया तांबे व काँग्रेसतर्फे मयुरी तांबे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. शुक्रवारी छाननीच्यावेळी काँग्रेसच्या मयुरी तांबे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविले. त्यामुळे काँग्रेसने नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी घेण्याची विनंती भिसे यांच्याकडे केली. मात्र, काँग्रेसची विनंती त्यांनी धुडकावून लावली.नगरपंचायतीच्या सर्व प्रभागातील नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी भिसे यांनी निवडणूक निरीक्षक रवींद्र सावळकर यांच्या उपस्थितीत अवैध ठरविलेल्या नामनिर्देशनपत्रावर सुनावणी घेतली. त्यावेळी काँग्रेसतर्फे अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी बाजू मांडताना सुप्रिया तांबे याआधी ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्यामुळे पडताळणी समितीकडील पावती ग्राह्य न धरता त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली. त्यावेळी भाजपतर्फे अ‍ॅड. उमेश सावंत यांनी बाजू मांडली. त्यानंतर भिसे यांनी काँग्रेसचा युक्तिवाद धुडकावून आधीचा निर्णय कायम ठेवताना मयुरी तांबे यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. (प्रतिनिधी)