शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची रविवारपासून ‘मच्छिमार संवाद यात्रा’

By admin | Updated: May 11, 2016 23:53 IST

रविकिरण तोरसकर : मच्छिमार गावांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणार

मालवण : मच्छिमार व मच्छिमार गावांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नाचा अभ्यास करून त्याचा कृती आराखडा शासन दरबारी मांडणे व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना शोधणे. सागरी पर्यटनाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील मच्छिमार युवक-युवतींना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध करून देणे तसेच दुर्लक्षित पर्यटन स्थळे जगासमोर आणणे या हेतूने भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेलच्या वतीने १५ मे ते १५ जून या कालावधीत 'मच्छिमार संवाद यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मच्छिमार गावांमध्ये भाजपाच्या मच्छिमार सेलचे पदाधिकारी मच्छिमारांशी संवाद साधणार आहेत. आरोंदा ते विजयदुर्ग या भागातील सर्व मच्छिमार गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नीलक्रांती’ संकल्पनेच्या पायाभरणीसाठी यात्रा मच्छिमारांना महत्वाची व फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली. मच्छिमार संवाद यात्रेत स्थानिक स्वराज्य संस्था, मच्छिमार सहकारी सोसायटी, प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवी संस्था, बचतगट, मच्छिविक्रेते, प्रशासकीय अधिकारी, मच्छिमारी सहकारी संस्था तसेच शैक्षणिक संस्था यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. मच्छिमार व मच्छिमार गावांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. मच्छिमारांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, रोजगार विषयक माहिती, मेळाव्याचे नियोजन, महिला बचतगट सक्षमीकरण, मुद्र्रा योजना, मच्छिमार युवकांसाठी व्यावसायिक व शैक्षणिक कर्ज आदी योजनाची माहितीही देण्यात येणार असल्याचे तोरसकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)आरोंदा टू विजयदुर्गजिल्ह्यातील आरोंदा ते विजयदुर्ग या ३९ मच्छिमारी गावांमध्ये एक गाव, एक दिवस अशी संवाद यात्रा असणार आहे. भाजप मच्छिमार सेल तसेच राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी व मासेमारीचे काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन तोरसकर यांनी केले आहे.