शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

भाजप जिल्ह्यात सेनेचा बालेकिल्ला पोखरणार

By admin | Updated: June 29, 2015 00:33 IST

मेहता यांची निवड : संपर्क मंत्रीपदावरून चर्चेला उधाण

रत्नागिरी : गेल्या काही दशकांपासून कोकण विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनून राहिला आहे. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने काहीशी घुसखोरी करीत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपला कोकणात आपला वेगळा ठसा उमटवणे वा कार्यकर्त्यांची मोट बांधणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे नव्या दमाने कोकणात भाजपचे बळ वाढवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाजपचे संपर्क मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांची नियुक्ती करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री म्हणून रामदास कदम हे काम पाहात आहेत, तर खेडमधून रवींद्र वायकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे दोन्ही मंत्री शिवसेनेचेच आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडे तीन, तर राष्ट्रवादीकडे दोन मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपला मात्र रत्नागिरी जिल्ह्यात तसेच शेजारच्या सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात एकाही ठिकाणी विधानसभा मतदारसंघ जिंकता आला नाही. युतीच्याच माध्यमातून यापूर्वीचा कारभार सुरु होता. परंतु आता राज्य स्तरावरच शिवसेना - भाजपचा काडीमोड झाल्यामुळे प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे आपले अस्तित्व निर्माण करण्याची वेळ आली आहे. कोकण हा शिवसेनेचा राजकीय बालेकिल्ला असताना राष्ट्रवादीने जोरदार धडक देत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आव्हान दिले आहे. मात्र, भाजप कोठेही बळकट असल्याचे दिसून येत नाही.कोकणआणि मुुंबई यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे मुुंबईतील यशासाठी कोकणातील संघटना बळकट असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. ही बाब लक्षात घेऊनच भाजपने गेल्या काही महिन्यांपासून कोकणात पक्ष संघटना मजबुतीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी देशभरातील सभासद मोहीमही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली. परंतु या मोहिमेला म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. ही बाब लक्षात घेऊनच राज्याच्या भाजप नेतृत्त्वाने कोकणातील संघटनेला बळकटी आणण्यासाठी काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. कोकणात भाजपचा स्वतंत्र मंत्री देण्यापेक्षा अन्य विभागात जे भाजपचे मंत्री म्हणून काम करतात, त्यांनाच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्रीपद देऊन पक्षसंघटना मजबूत करता येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते आहे. त्यातूनच संपर्क मंत्रीपदाचा विषय पुढे आला आहे. तरीही कोकणातीलच एखाद्या भाजप नेत्याला मंत्रीपद द्यावे, अशी कोकणमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यादृष्टीने भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुरेंद्र तथा बाळ माने तसेच माजी आमदार विनय नातू यांच्याकडे मंत्रीपद दिले जावे, अशी येथील भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यातून अनेक विकासकामांना गती मिळून अन्य पक्षांना शह देणे सोपे जाईल. तसेच पक्ष संघटनाही मजबूत बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संपर्क मंत्रीपदाचा पर्याय स्वीकारला जाणार की, कोकणातील नेत्याला मंत्रीपद दिले जाणार, याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत. (प्रर्तििनधी)कोकणात मजबूत संघटन करणार कोकणात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता कोकणकडे आपला मोर्चा वळविला आहे. संपर्क मंत्रीपद महत्त्वाचे असून, प्रकाश मेहता यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. संपूर्ण कोकणात जिल्ह्यात राज्य सरकारमधील महत्त्वाचे पद देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.