शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

मालवणच्या विकासासाठी भाजप शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: April 4, 2015 00:14 IST

बाबा मोंडकर : सत्ताधारी काँग्रेस कामे करण्यास अपयशी

मालवण : शहरवासीयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे प्रतिपादन बाबा मोंडकर यांनी केले. मालवण नगरपालिकेच्या यापूर्वी झालेल्या सभेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याविषयीचा ठराव झाला. या पार्श्वभूमीवर मालवण भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुनील मोंडकर, भाऊ सामंत, विलास हडकर, दादा वाघ, सुरेश मसुरकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, बबन परुळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मोंडकर म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात मालवणचे राष्ट्रवादी पुरस्कृत माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊन सीआरझेडमुळे बांधकाम करण्यास अडचणी येत आहेत, असे गाऱ्हाणे मांडले होते. यावर राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत या विषयावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेतली व मालवणच्या मुख्याधिकाऱ्यांना पर्यावरणमंत्र्यांनी मालवण पालिकेने सरकारकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा व त्यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. असे असताना लोकसेवक म्हणविणारे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर स्थानिक जनतेच्या विरोधात आक्रमक होतात, हे चुकीचे आहे. वस्तुत: सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे मालवण शहराला दरवर्षी सुमारे ६ लाख पर्यटक भेट देतात. परंतु, मालवण नगरपालिका मासिक सभेत शहरातील अन्य प्रलंबित गोष्टींवर चर्चा करीत नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे, असे मोंडकर म्हणाले. मोठा गाजावाजा करून कचऱ्यावर वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचे पालिकेच्यावतीने सांगितले होते. परंतु, हा प्रकल्प गॅसनिर्मितीवरच करण्यात आला. यासाठी लागणारा कचरा उपलब्ध असूनदेखील ज्यांना कचरा उचलण्याचे टेंडर दिले, ते पूर्ण क्षमतेने उचलत नाहीत. (प्रतिनिधी)पर्यटन निधीमधून चिवला बीच येथे वॉटरस्पोर्ट प्रकल्प चालू करण्यासाठी निधी खर्च केला व गेली कित्येक वर्षांची एकहाती सत्ता असूनही हे वॉटरस्पोर्ट चालू झाले नाही. तसेच त्याविषयी नियमावली बनवण्यास सत्ताधारी असमर्थ ठरले, अशी टीका करीत मोंडकर म्हणाले, शहरात बंद असलेल्या स्ट्रीटलाईटचा प्रश्न गंभीर आहे. भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. या कामातील चेंबरच्या बांधकामावर पाणी मारले जात नाही. लाखो रुपये खर्च करून आणलेला जनरेटर व पुढे लागणारे सामान धूळ खात पडले आहे. याचीही या सत्ताधारी नगरसेवकांना फिकीर नाही. असे कित्येक प्रश्न शहरात प्रलंबित आहेत. यावर सत्ताधारी नगरसेवक लक्ष देत नाहीत. म्हणूनच मालवण नगरपालिकेच्या प्रलंबित प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.