शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

भाजप कोकणवर राग काढतोय

By admin | Updated: August 30, 2015 00:28 IST

परशुराम उपरकर : केमिकल झोनला मनसेचा विरोधच

सावंतवाडी : कोकणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होऊनसुद्धा एकही उमेदवार निवडून आला नाही. याचा राग सध्या भाजप सरकार काढत असल्यानेच त्यांनी कोकणात केमिकल झोन आणण्याचा घाट घातला आहे. त्याला मनसेचा तीव्र विरोध असून प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, बाबुराव गावडे, दत्ताराम गावकर, श्रेया देसाई, अभिमन्यू गावडे आदि यावेळी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, कोकण हा निसर्गदृष्ट्या संपन्न आहे. या ठिकाणी फलोत्पादनासारखे प्रकल्प आणणे गरजेचे आहे. मात्र ते न आणता केमिकल झोनसारखे प्रकल्प आणण्याचे काम सुरू आहे. यांची माहिती सरकारमधील उद्योग व पर्यावरण मंत्री यांनासुद्धा नाही. मग भाजप सरकार निवडणुकीतील राग काढत आहे का? असा सवाल करीत विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोकणात शेवटच्या दिवशी दोन सभा झाल्या. मात्र, एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही. यामुळे भाजप बिथरली असून ते पर्यावरण बाधक प्रकल्प आणून राग व्यक्त करीत आहेत. हे कदापि आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. युती सरकारमध्ये दीपक केसरकर हे मंत्री असून या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तेही या विषयावर काहीही भाष्य करीत नाहीत मग त्यांना हा झोन हवा आहे का? अशी शंका येत आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. (प्रतिनिधी)