शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

भाजपने काढला राष्ट्रवादीचा ‘काट्याने काटा’

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

‘हाता’वरच्या ‘काट्या’त ‘कमळ’ फुलले : तासगावात नगराध्यक्षांची खुर्ची ठरली राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू

दत्ता पाटील - तासगाव  -एकमेव नगरसेवक असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पाठिंब्यावर हातात घड्याळ घालून नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर दावा केला. तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादी-काँग्रेसचे सिंंहासन डळमळणार नाही, असे वाटत होते. याचवेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपने हाताशी धरुन धक्कातंत्र अवलंबले. काँग्रेसच्या हातावर चढविलेल्या घड्याळाच्या काट्यांनी तासगावात भाजपचे कमळ फुलविण्याचा मार्ग सुकर झाला. तासगावातील राजकीय भूकंपासाठी नगराध्यक्ष पदाची खुर्ची केंद्रबिंदू ठरली. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचा काट्याने काटा काढण्याची यशस्वी खेळी भाजपने केली. खरे तर तासगाव नगरपालिकेतील दोन अपक्ष आणि एका काँग्रेस नगरसेवकाचा अपवाद सोडला, तर उर्वरित सर्व नगरसेवकांनी हातात घड्याळ बांधूनच नगरपालिकेत प्रवेश केला होता. मात्र गेल्या काही वर्षात राजकीय परिस्थितीत बदल झाला. खासदार संजयकाकांनी भाजपची वाट धरली.त्यांच्याबरोबर त्यांच्या शिलेदार नगरसेवकांनीही भाजपचा रस्ता धरला. नगरपालिकेतील राजकारण अस्थिर झाले. काका गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकाला नगराध्यक्ष पदाची खुर्ची बहाल केली. तेव्हापासूनच खरे तर राष्ट्रवादीत असंतोषाचा लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. वर्षभराच्या कालावधीनंतर काका गटाच्या नगरसेवकांनी या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेसच्या नगराध्यक्षाने राजीनामा देण्यासाठी आबा गटाला पाठिंबा देण्यासाठी सहमती दर्शवली. मात्र राष्ट्रवादीकडून राजकीय भवितव्याचा विचार करुन, काका गटाशी जुळवून घेण्यासाठी नेत्यांनी विरोध केला. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा भाजपच्या नेत्यांनी घेतला. राष्ट्रवादीतील नाराजीला खत-पाणी घातले. इतके दिवस नगराध्यक्षांच्या खुर्चीखाली उसळत असलेला लाव्हारस बाहेर आला. राष्ट्रवादीत राजकीय भूकंप झाला. तीन नगरसेवकांनी भाजपचे कमळ हातात घेतले. मात्र नगराध्यक्षाच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी आणखी दोन नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे पुन्हा तीन नगरसेवकांना गळ लावला. पण त्यांना भाजपमध्ये खेचण्यात अपयश आले. मात्र नगराध्यक्षांविरोधात आणि पर्यायाने राष्ट्रवादीविरोधात उभे करण्यात यश आले. सहा नगरसेवकांचे काटे राष्ट्रवादीच्या निर्णयाच्या उलट दिशेने फिरले. त्यामुळे राष्ट्रवादीत दोनच नगरसेवक राहणार असून नगरपालिकेच्या राजकारणात पक्षाचे बारा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेत भाजपचे कमळ फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, काट्याने काटा काढण्याची खेळी यशस्वी ठरली आहे. या सर्व घडामोडी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठीच झालेल्या असून, येणाऱ्या काळात ही खुर्ची आणखी कोणता रंग आणणार, याकडे तासगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहेनाराजीच्या धक्क्यांची परंपरा जुनीच तीन नगरसेवकांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी दोन नगरसेवकांना नगराध्यक्षपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. याच नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे नगराध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र नेत्यांनी दिलेला सबुरीचा सल्ला त्यांना पचनी पडला नाही. नगरपालिकेत दोन्ही गटांनी एकत्रित निवडून आल्यापासूनच आबा गटाला नाराजीचा सामना करावा लागला होता. याच नाराजीतून वर्षापूर्वी माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुगडे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका जयश्री धाबुगडे यांनी काका गटात प्रवेश केला होता.