शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चिपळुणात उद्यापासून पक्षीवैभव सर्वेक्षण

By admin | Updated: June 19, 2015 00:22 IST

अली पुण्यतिथी : पक्ष्यांची पुस्तिकाही काढणार

चिपळूण : चिपळूणच्या पक्षीमित्रांच्यावतीने चिपळूणमधील पक्ष्यांचे सर्वेक्षण व अभ्यास असा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ २० जून सलीम अली पुण्यतिथीच्या दिवशी होणार असून, लगेचच दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७ वाजता रामतीर्थ तलाव येथे पक्षी निरीक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे.या प्रकल्पात चिपळूणमधील पक्ष्यांचे सर्वेक्षण, अभ्यास करण्यात येणार असून, त्यांची विविध हंगामातील स्थलांतरे इत्यादी बाबी शोधून काढण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये चिपळूणमधील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पक्षीमित्र, महिला, गृहिणी, पक्षीतज्ज्ञ यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर वनविभाग, चिपळूण नगरपरिषद व इतर शासकीय विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची पहिली कार्यशाळा दि. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सह्याद्री निसर्ग मित्रच्या कार्यालयात घेण्यात आली. पक्षीमित्रांच्या १० टीम करण्यात आल्या असून, चिपळूणच्या १० भागात त्या सर्वेक्षण करणार आहेत. दर पंधरा दिवसांनी संपूर्ण चिपळूणच्या पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये सर्वांना सहभागी करुन एक मोठी पक्षी गणना घेण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमातून चिपळूणचे पक्षीवैभव एकत्रितपणे शोधले जाणार आहे. त्याचा उपयोग पर्यटनासाठी करुन घेण्यात येणार आहे. तसेच पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धानसाठी याचा उपयोग होणार आहे.या कार्यक्रमाची जबाबदारी सह्याद्री निसर्ग संस्था, चिपळूणने घेतली असून, ऋतुजा खरे यांच्या नेतृत्त्वाखाली हा संपूर्ण अभ्यास होणार आहे. एक वर्षाच्या या प्रकल्पातून चिपळूणच्या पक्ष्यांची एक छोटी पुस्तिका काढण्यात येणार आहे. रविवार, २१ जून रोजी सकाळी ७ वाजता रामतीर्थ तलाव येथे पक्षीमित्रांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्रीच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)