शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

डोंगुर्ला तलावावर पक्ष्यांचे संमेलन--लोकमत विशेष

By admin | Updated: May 29, 2015 23:47 IST

तीव्र उकाड्यावर उपाय : २0 किलोमीटर परिसरातून हजेरी, ४0 ते ५0 विविध जाती

संदीप बोडवे -  मालवण-- अंगाची लाही लाही करणाऱ्या आणि तहानेने जीव व्याकूळ करणाऱ्या या प्रचंड उन्हाळ््यात पशु-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी काही मोजकेच पाणवठे शिल्लक राहिले आहेत. मनुष्य प्राण्याने दुर्लक्षित केलेला मालवण शहराला लागून असलेला पाणी साठा परिसरातील पशु-पक्ष्यांची तहान भागवित आहे. यामुळेच डोंगुर्ला तलाव परिसरात दिवसभर विविध प्रकारच्या पक्षांचे जणू विविधारंगी संमेलन भरल्याचे भासते.डोंगुर्ला तलावाच्या पाणवठ्यावर २० किलोमीटर परिघातील पशु-पक्षी आपली तहान भागवत आहेत. डोंगुर्ला तलावाच्या परिसरात सकाळच्या रामप्रहरी जर फेरफटका मारला तर निरीक्षकाला ४० ते ५० विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती दिसून येतील. यात छोट्या टिटवीपासून ते मोठ्या आकाराच्या धनेशापर्यंत विविध पक्ष्यांचा वावर दिसून येतो. कित्येक पक्ष्यांनी तर तलाव परिसरातील वनराईत आपले संसार थाटले आहेत.डोंगुर्ला तलाव परिसरात दिवसभरात कधीही गेलात तरी तुमच्या डोक्यावरून सहजपणे भुर्रकन पाण्यात सूर मारून मासोळी उचलण्याचा प्रयत्न करणारा खंड्या आढळून येतो किंवा खडकावर ध्यान लावून भक्ष्याच्या शोधात बसलेला पाणकावळा हमखास दिसतो. आजुबाजूच्या दलदलीत मान उंच करून सावधपणे फिरताना टिटवी दिसते. शिंजीर किंवा सूर्यपक्षी अगदी क्वचितच शांत बसलेला दिसेल. तो एकतर सतत इकडून तिकडे उडताना दिसेल किंवा सतत वीचीऽऽ वीचीऽऽ चीचीची, वीचीऽऽ असा चिवचिवाट करताना दिसेल. कापशी एखाद्या पर्णहिन झाडाच्या शेंड्यावर बसून पाण्यात उगाचच पाहताना दिसेल. तांबट, निखार, बुलबुल, हळद्या हे पक्षी तळ््याकाठच्या झुडपात आढळतात. तलावाच्या वळणावर नेहमीच आढळणारा रानकोंबडा तर महाचलाख, जरा कुठे काडी मोडली की तो पातेऱ्यावरून सुसाट धाव सुटेल. तळ््यात डुंबणाऱ्या म्हशींच्या पाठीवर धीटपणे बसून परिसराची रखवाली करणारा कोतवालही आवर्जून उपस्थित असतो. भल्या पहाटेपासून ते दिवस मावळतीला जाईपर्यंत डोंगुर्ला तलाव परिसरात जणू पक्ष्यांचा मेळाच फुललेला असतो. सर्वच भागात पाण्याची पातळी कमालीची घटली असून सर्वच जण आतुरतेने मेघराजाची वाट पाहत आहेत. पक्ष्यांसाठी जीवनदायिनीउरले-सुरले पाणवठे सुके पडलेमालवण परिसरात सहजगत्या २० ते २५ हून अधिक प्रकारचे पक्षी आढळून येतात. सध्या उन्हाळी काहिली प्रचंड वाढली आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे शहरानजिकचे उरले सुरले पाणवठे सुके पडले आहेत. कडक उन्हाळ््यामुळे माणसांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.तशीच परिस्थिती पशु- पक्ष्यांचीसुद्धा आहे. मात्र, याला अपवाद आहे तो मालवण शहराला लागून असलेला ऐतिहासिक डोंगुर्ला तलाव. डोंगर कपारी आणि गर्द झाडींनी वेढलेल्या या तलावात आजही बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. चोहोबाजूंनी असलेली वनराई आणि मुबलक पाणी साठ्यामुळे ऐन उन्हाळ््यात डोंगुर्ला तलाव पक्ष्यांसाठी जीवनदायिनीच ठरला आहे.सकाळच्या वेळात किंवा सायंकाळच्या वेळात हे पक्षी आवर्जून येथे येतात.