शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विजापूरचा विद्यार्थी दरीत कोसळला

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

चेतना कॉलेजचा विद्यार्थी

आंबोली : विजापूर येथील चेतना कॉलेजच्या विद्यार्थ्याला आंबोलीतील पर्यटन चांगलेच महागात पडले. गेळे येथील कावळेसाद पॉर्इंटवरील रेलिंग पार करताना पाय घसरून पवन कुलकर्णी (वय २१, रा. विजापूर, कर्नाटक) हा विद्यार्थी दरीत कोसळला. ही घटना आज, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पवनचा शोध घेण्याचे काम सावंतवाडी पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी करीत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडू शकला नाही.याबाबत माहिती अशी की, विजापूर येथील चेतना महाविद्यालयाचे बीसीए अभ्यासक्रम शिकणारे सात विद्यार्थी आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी कावळेसाद गेळे येथील धबधब्याचा आनंद लुटला. याच वेळी कावळेसाद येथील सिंमेटच्या बंधाऱ्यावरून पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पवन कुलकर्णी हा या रेलिंगला धरत बंधाऱ्यावरून जात होता. पवन सोबत असलेले रामचंद्र पाटील, सदाशिव मुळवाड, प्रवीण गुरकुले, अविनाश बिरादार, अनंत कोरी, मुर्गेश आळगुदगी या त्याच्या मित्रांनी त्याला जाण्यास मज्जाव केला. मात्र, पवन ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने मित्रांच्या विरोधानंतरही रेलिंगला पकडून बंधाऱ्यावर चालण्यास सुरुवात केली. पाय घसरल्याने पवनचा रेलिंगचा हात सुटला व पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे तो खाली कोसळला. यावेळी मित्रांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्नही केला; पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तो सुमारे १८०० ते २००० फूट खोल दरीत कोसळला. मित्रांनी त्याची शोधाशोध केली, परंतु मुसळधार पाऊस व दाट धुके यामुळे तो दरीत दिसेनासा झाला. या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर लगेच तिथे पोलीसपाटील दशरथ कदम दाखल झाले आणि आंबोली पोलिसांना याबाबत माहिती दिली. तत्काळ आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच सावतंवाडी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना याबाबत माहिती दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. तेथील परिस्थितीवर तहसीलदार सतीश कदम हे लक्ष ठेवून असून, युवकाची शोधाशोध उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, धुके व पावसामुळे शोधकार्यात बाधा येत होती.पवन कुलकर्णी हा बीसीएचे शिक्षण घेत असूून, त्याची आई शिक्षिका, तर वडील कर्नाटकात एसटी महामंडळात वाहक आहेत. घटनेची माहिती पवनच्या आई-वडिलांना देण्यात आली आहे. ते आंबोलीकडे येण्यास निघाले आहेत. (वार्ताहर)