शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात होणार महाकाय पेट्रो प्रकल्प

By admin | Updated: July 3, 2016 23:34 IST

दोन लाख कोटी खर्च : १५ हजार एकर जमीन लागणार

मुंबई: ‘नवरत्नां’मध्ये गणल्या जाणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या मिळून देशातील सर्वांत मोठा तेल शु्द्धिकरण प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असून त्यासाठी नेमके ठिकाण अद्याप ठरले नसले तरी कोकणात दोन-तीन ठिकाणी त्यासाठी शोध सुरु आहे. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सर्वांत मोठ्या सरकारी तेल कंपन्या व ‘इंजिनियर्स इंडिया लि.’ ही आघाडीची सरकारी अभियांत्रिकी कंपनी मिळून हा महाकाय प्रकल्प उभारणार आहेत. खनिज तेलाचे शुद्धिकरण आणि अन्य अनुषंगिक पेट्रोजन्य पदार्थांचे उत्पादन असा मिळून हा एकत्रित प्रकल्प असेल. इंडियन आॅईलचे संचालक (रिफायनरीज) संजीव सिंग यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ही माहिती दिली. या प्करल्पासाठी १२ ते १५ हजार एकर जागा लागेल व त्यादृष्टीने महाराष्ट्रात पश्चिम किनाऱ्यावर (म्हणजेच कोकणात) दोन ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील आजवरच्या सर्वात मोठया अशा या पेट्रोकेमिकल प्रकल्पाची वार्षिक क्षमता ६० दशलक्ष टन असेल व त्याच्या उभारणीसाठी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे, असेही सिंग म्हणाले. हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्याची योजना आहे. पहिला टप्पा सुमारे १.२ ते १.५ लाख कोटी रुपये खर्चाचा असेल. त्यात वार्षिक प्रत्येकी २० दशलक्ष टन क्षेमतेच्या दोन तेल शुद्धिकरण संयंत्रांखेरीज सुगंधी रसायने, नॅप्था क्रॅकर व पॉलिमर उत्पादनांची सोय असेल. जमीन संपादन पूर्ण झाल्यापासून पाचते सहा वर्षांत पहिला टप्पा उभारून पूर्ण होईल. त्यानंतर ५० ते ६० हजार कोटी रुपये खर्चाचा दुसरा टप्पा हाती घेण्यात येईल, असे सिंग म्हणाले. या पेट्रोकेमिकल प्रकल्पात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) व विमानाच्या इंधनाखेरीज इतर पेट्रोजन्य पदार्थांचे उत्पादन होईल. येथून महाराष्ट्रातील प्लास्टिक, रसायने व कापड उद्योगांसाठी कच्चा मालही पुरविला जाऊ शकेल. (विशेष प्रतिनिधी) कोकणातील जागा सोईची हा प्रकल्प पश्चिम किनारपट्टीवर उभारणे नैसर्गिक लाभाचे ठरेल. कारण आखाती देश, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतून सागरी मार्गाने खनिज तेल येथे आणणे सोईचे ठरेल. हाच प्रकल्प पूर्व किनारपट्टीवर उभारला तर आयात खनिज तेलाचा वाहतूक खर्च बॅरलमागे एक डॉलरने वाढेल. मागणी असलेल्या देशांतर्गत बाजारपेठेत येथून तयार तेल उत्पादने पाठविणेही सुलभ पडेल. इंडियन आॅईलचे सध्याचे सर्व तेल शुद्धिकरण कारखाने प्रामुख्याने उत्तर भारतात असल्याने तेथून दक्षिण व पश्चिम भारतात माल पुरविणे अडचणीचे ठरते. त्यामुळे इंडियन आॅईल पश्चिम किनाऱ्यावर नवा कारखाना काढण्याच्या विचारात होतीच. भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे मुंबईत तेल शुद्धिकरण कारखाने आहेत, परंतु वाढती मागणी पूर्ण करण्यास ते कमी पडतात.