शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक मासळी मार्केटचे भूमिपूजन

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

मच्छिमार महिलांचा प्रश्न मार्गी : राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्डाची संकल्पना

आचरा : आचरा गाव विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर न्यावयाचा असल्यास पक्षीय राजकारण करत न बसता पक्षीय वल्कले बाजूला सारून विकास साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार किरण पावसकर यांनी केले. आचरा येथील नव्याने होणाऱ्या अत्याधुनिक मासळी मार्केट भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड हैद्राबाद यांच्या योजनेतून साकारणाऱ्या अत्याधुनिक मासळी मार्केट भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, मत्स्य उद्योग विकास मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, स्वीय सहाय्यक अशोक पाडावे, मच्छिमार संघटना अध्यक्ष नारायण कुबल, मासळी मार्केटला जागा उपलब्ध करून देणारे उदय लाड, सुरेश ठाकूर, प्रदीप मिराशी, संतोष मिराशी, रविंद्र गुरव, मच्छिमार बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पावसकर म्हणाले की, आज आचऱ्यात ताजी मासळी उपलब्ध आहे. परंतु ती मासळी विकणारी महिला अनेक अडचणींना तोंड देत रस्त्यावर बसून मच्छि विक्री करते. मच्छि विकणाऱ्या महिलांची मच्छि विकताना मार्केट नसल्याने परवड होत होती. आज या महिलांना या मार्केटमध्ये १०३ गाळे उपलब्ध होणार असून पाणी, आसन व्यवस्था, शीतगृह यासारख्या सोयी उपलब्ध होणार आहेत. गावाच्या विकासासाठी आपल्या ग्रामस्थांची साथ आवश्यक असल्याचे ते म्हणाले. विकासासाठी एमटीडीसीच्या माध्यमातून आचरे गावासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असून विकासाची रुपरेषा ठरविताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले पाहिजे.मार्केटसाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देणाऱ्या उदय लाड या जमिन मालकाचा आमदार पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)