शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापौर, जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:34 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त महापौर सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापौर, जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिवादनजिल्हाधिकारी यांचा सत्कार

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त महापौर सूरमंजिरी लाटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याणचे वरिष्ठ निरीक्षक संजय पवार, बाळासाहेब भोसले, तकदीर कांबळे, सुभाष देसाई, संग्राम यादव, गौतम करूणादित्य, कादरभाई मलबारी, आदिल फरास, गनीभाई आजरेकर, चंद्रकांत माने, डॉ. महेंद्र कानडे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.या ठिकाणी प्रशांत आंबी, निलेश बनसोडे यांनी ज्ञानवंदना हा उपक्रम सुरू केला होता. एक पेन एक वही या उपक्रमांतर्गत स्वीकरली जाते. गोळा झालेल्या वह्या आणि पेन गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते. गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर श्रीमती लाटकर यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी यांचा सत्कारशाहूवाडी तालुक्यातील मौजे मरळे येथील 35 मागासवर्गीय कुटुंबांना त्यांच्या वहिवाटीस व प्रत्यक्ष ताब्यात असलेली जमीन कायम मालकी हक्काने देण्याचा निर्णय काल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला. या आदेशावर रात्री उशिरा थांबून जिल्हाधिकाऱ्यांनी सही केली.

1948 पासून प्रतिक्षा असलेल्या या प्रकरणाबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. देसाई यांचा पुष्पगुच्छ देवून महापौर श्रीमती लाटकर यांनी सत्कार केला. या प्रसंगी युवक, महिला, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरkolhapurकोल्हापूर