शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भंडारी समाजाने एकजुटीने विकास करावा

By admin | Updated: August 30, 2015 23:56 IST

गुरूनाथ पेडणेकर : तळवडेत भंडारी समाज मेळावा

तळवडे : भंडारी समाजाने एकत्र येऊन आपली एकजूट दाखावावी. जिल्ह्यात भंडारी समाजाची संख्या जास्त आहे; पण एकजूट नाही, अशी खंत व्यक्त करीत आणण एकजूट दाखविल्यास आपणच आपला विकास करू शकतो, असे ठाम मत तळवडे येथे भंडारी समाज मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी केले.या मेळाव्यावेळी तळवडे येथे नव्यानेच भंडारी समाज मंडळाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त तळवडे पंचक्रोशीतील भंडारी समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळवडे, होडावडे, मातोंड, पेंडूर, निरवडे येथील भंडारी समाजबांधव एकत्र आले होते. तळवडे या ठिकाणी भाई पेडणेकर यांच्या घरी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पेडणेकर म्हणाले, आज भंडारी समाजाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या समाजातील लोक हे चिकाटी व जिद्दीवान असतात. त्यामुळे आपण एकजूट दाखवावी. कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण आपली जात, कर्तव्ये विसरू नयेत, असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष मामा माडये, सावंतवाडी तालुका भंडारी समाज अध्यक्ष राजाराम वराडकर, माजी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, जिल्हा पदाधिकारी सुनील नाईक, दशरथ घाडी, लक्ष्मण धुरी, तळवडेचे सरपंच पंकज पेडणेकर, वैशाली पटेकर, तळवडे भंडारी समाज अध्यक्ष प्रवीण कोंडये, मळगावचे सरपंच गणेश पेडणेकर, भाई पेडणेकर, विजय रेडकर, तालुका पदाधिकारी बाळू साळगावकर, सुनंदा मयेकर, नीळकंठ नागडे, भूषण पेडणेकर, प्रशांत बुगडे, नंदकिशोर बुगडे, दादा पेडणेकर, प्रसाद आडेलकर तसेच तळवडे गावातील भंडारी समाजबांधव, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.तळवडे गावात प्रथम भंडारी समाजाचा बऱ्याच वर्षांनंतर मेळावा आयोजित करण्यात आला. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मामा माडये म्हणाले, आज भंडारी समाजाला एकजूट करून आपली ताकद दाखविणे गरजेचे आहे. तरच समाजाचा विकास शक्य आहे, असे आवाहन त्यांनी केले.