शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा नगर पालिकेला पावला ‘मार्च एन्ड’

By admin | Updated: April 3, 2015 00:23 IST

मालमत्ता कर चुकविणाऱ्या करधारकांविरोधात नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कधी

तिजोरीत २.५ कोटी जमा : वसुलीचा आकडा २० टक्क्याने वाढलाभंडारा : मालमत्ता कर चुकविणाऱ्या करधारकांविरोधात नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कधी नव्हे एवढा अडीच कोटी रुपयांचा महसूल भंडारा नगर पालिकेला प्राप्त झाला आहे. ही मोहीम आणखी १५ दिवस सुरू राहणार आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी महसुलात २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एक ते सव्वा लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात मालमत्ता करातून नगर पालिकेला कोट्यवधींचा महसूल मिळत असतो. परंतु, मालमत्ताधारक कर भरण्यास इच्छुक नसतात. कर न भरल्यामुळे महसुलात तूट निर्माण होते व पालिकेला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पालिकेत होते. तथापि, यावर्षी मालमत्ता कराचे देयके घरोघरी पोहचविण्यात आल्यानंतर कर भरण्यासाठी पालिकेकडून वारंवार जागृती करण्यात आली. शहरात दवंडी पिटून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. रविवार व सुटीच्या दिवशीसुद्धा पालिकेच्या कार्यालयात कर भरण्याची सुविधा करून दिली होती. या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी करवसुली पथक तयार करून ज्यांचे कर थकित आहेत, त्यांच्याकडून कर वसूल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, या पथकाने घरोघरी जाऊन अधिकाधीक कर वसुलीचे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. जे नागरिक कर भरणार नाही, त्यांची मालमत्ता सील करण्याचा इशारा दिल्यानंतर थकबाकीदारांनी कर भरून सहकार्य केले. पालिका प्रशासनाने या कठोर निर्णयामुळे भंडारा पालिकेकडे मालमत्ता करापोटी अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. आणखी १५ दिवस कर वसुलीची मोहीम सुरू राहणार असल्याने या महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शहरातील दोन टॉवर केले सीलशहरातील मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी अनेकदा सांगण्यात आल्यानंतरही ज्यांनी सहकार्य केले नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शहरातील टॉवरधारकांनी कर न भरल्यामुळे दोन टॉवर सील करण्यात आले. नऊ टॉवरपैकी तीन जणांनी कर भरला असून ऊर्वरित सहा टॉवरधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जप्ती कारवाई टाळाकर वसुली करण्यासाठी पालिकेने स्पष्ट धोरण आखले. मालमत्ताधारकांनी कर भरावे, असा प्रयत्न आहे. परंतु, काही नागरीक कर भरत नसल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले. हा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी थकित कर तातडीने भरुन जप्तीची कारवाई टाळावी.- बाबूराव बागडे,नगराध्यक्ष, भंडारा.