शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

भजनाच्या जागराने उत्साहाला उधाण

By admin | Updated: September 27, 2015 00:38 IST

युवा वर्गाचा सहभाग : नवीन चाली ठरताहेत ‘सुपरहिट’

सिद्धेश आचरेकर, मालवण : कोकणवासीयांचा महाउत्सव म्हणजे लाडक्या बाप्पाचा सण. गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्गात भजन कलेला वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे भजनाच्या जागर गणेशोत्सवाच्या धामधूमीत महत्वाची भूमिका बजावतो. तसेच जिल्ह्यात भजन संप्रदाय आणि गणेशोत्सवाचे वेगळेच नाते कित्येक वर्षे चिरकाल टिकून आहे. जिल्ह्यात गेले दहा दिवस भजनांच्या जागराने सर्वत्र वातावरण मंगलमय बनले आहे. प्रासादिक भजन मंडळांना गणेश चतुर्थी सणात मोठी मागणी असते. त्यामुळे जिल्ह्यात भजनच्या स्वरांनी गणेश भक्त न्हाऊन गेले आहेत. १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची धामधूम जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरु आहे. याच धामधुमीत भजन खरी रंगत आणते. भजनाची गोडी अबाल-वृद्धांपर्यंत असल्याने भजनाला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. गणपतीचे ११ दिवस भजनाच्या जागरांनी हरएक रात्र स्वरमय आहे. या अहोरात्र जागराने बाप्पाच्या उत्साहाला उधाण प्राप्त झाले आहे. गणरायाची मनोभावे सेवा करण्यासाठी आतुरलेली भजन मंडळे तन-मन-धन विसरून हरिनामाच्या जपात तल्लीन झाल्याचे सर्वत्र चित्र आहे. इंटरनेट, सोशल मीडियाच्या जाळ्यात भरकटत गेलेला युवा वर्गही भक्तीरसात गुंतला आहे. शास्त्रोक्त संगीत शिक्षण घेतलेले बुवा अशा या गणेशोत्सवातून उदयास येत आहेत. उदयोन्मुख बुवांसाठी नव्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांच्या हटके चाली तर भजनावर अधिराज्य गाजवत आहे. तरुण कोरसना नव्या दमाच्या गाण्याच्या चालीतून गाणी गायल्यास अथवा म्हटल्यास भजनालाही वेगळाच साज चढतो. देवा तुझ्या सेवेसाठी गणेश चतुर्थीपासून खऱ्या अर्थाने भजनाला सुरुवात होते. भगवंतांचे नामस्मरण मनोभावे करण्यासाठी भजन मंडळे आणि त्यांचे सहकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता भजनातून देवाच्या चरणी लीन होतात. आताच्या घडीला डिझेल, पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असले तरी बाप्पाच्या सेवेसाठी तत्परता दाखवून प्रासादिक भजन मंडळे कमी किमतीचीही सुपारी घेतात. भजनातून देवाचे नामस्मरण करून भक्ती केली जाते. खाद्य संस्कृतीचा मिलाप अलीकडील काही वर्षात भजन संपल्यानंतर खाद्यप्रकारांची रेलचेल चाखायला मिळते. विविध खाद्य पदार्थ बनविण्याची स्पर्धा घरोघरी रंगल्याचे गणेशोत्सवात चित्र असते. मिसळ पाव, कांदा-पोहे, भजी, वडे, एवढेच नव्हे तर व्हेज राईस आदी इतर फास्टफूडचे पदार्थ भजनप्रेमीना चाखायला मिळत आहे. पूर्वी भजन म्हटलं की लाडू दिला जायचा. कित्येक वर्षे लाडवाने आपली जागा सोडली नव्हती. मात्र गेल्या सात-आठ वर्षात लाडू हळूहळू नामशेष होत चालला आहे. आजच्या युवाईला जीभेवर रेंगाळणारी चव हवी असते. ग्रामीण भागात भजन संपल्यावर तर शहरी भागात अगदी आरतीच्या वेळी सुद्धा नाविन्यपूर्ण पदार्थ दिले जातात.