शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशातील उत्कृष्ट स्कुबा डायव्हींग हॉलिडे स्पॉट ‘तारकर्ली’ पर्यटनक्षेत्र

By admin | Updated: April 18, 2015 00:03 IST

‘हॉलिडे आयक्यू डॉट कॉम’ने केला सर्व्हे

मालवण : देशी-विदेशी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या तारकर्ली पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशातील पर्यटन क्षेत्रांचा अभ्यास करणाऱ्या हॉलिडे आयक्यू डॉट कॉम या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने केलेल्या सर्व्हेत तारकर्ली हे जागतिक दर्जाच्या भारतातील सहा हॉलिडे स्पॉटमध्ये असल्याचे आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.पंचवीस वर्षापूर्वी जगाच्या पर्यटन नकाशावर नाव पटकावलेल्या तारकर्लीला आदरातिथ्यात सर्वोत्तम असल्याचेही हॉलिडे आयक्यूने गतवर्षी जाहीर केले होते. १९९०च्या दशकात निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्याच्यादृष्टीने तत्कालिन काँग्रेस नेते कै. वाय. डी. सावंत आणि तत्कालिन खासदार सुधीर सावंत यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सावंतद्वयींच्या या प्रयत्नाने स्वच्छ किनारा लाभलेल्या तारकर्ली गावाला जगाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळाले. युती सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर तारकर्लीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देशी- विदेशी पर्यटकांची पावले वळू लागली.अलिकडच्या काळात स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग यासारख्या जलक्रीडा सुरू झाल्याने मालवण, तारकर्ली, देवबागला देशी- विदेशी पर्यटकांनी पसंती दिली. चार दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉलिडे आयक्यू या ट्रॅव्हल्स कंपनीने भारतातील पर्यटनस्थळांचा जो सर्व्हे केला त्या सर्व्हेत भारतातील स्कुबा डायव्हींगमधील नामांकीत हॉलिडे स्पॉट म्हणून देशी- विदेशी पर्यटकांनी आपल्या पसंतीची मोहोर उठवली त्यात लक्षद्विप, गोवा, मुर्डेश्वर, अंदमान, पाँडेचेरी आणि तारकर्ली या सहा पर्यटनस्थळांचा समावेश आहे.हॉलिडे आयक्यू या कंपनीच्या संकेतस्थळावर तारकर्लीतील पर्यटनाची महती प्रसिद्ध करताना तारकर्लीचे बॅकवॉटर, वॉटर स्पोर्टस, डॉल्फीनची सफर, बोटींगची सेवा ही दर्जेदार असल्याचे म्हटले आहे. यात प्रामुख्याने स्कुबा डायव्हींग या जलक्रीडेची उत्तम सेवा दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतातील स्कुबा डायव्हींग हॉलिडे स्पॉटच्या प्रमुख सहामध्ये तारकर्लीने मोहोर उठविल्याने पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेआहे. (प्रतिनिधी)