शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

देवबागवासीय भीतीच्या छायेखाली

By admin | Updated: June 13, 2014 01:43 IST

महाकाय लाटांनी बंधारा उद्ध्वस्त : समुद्रात तिसऱ्या दिवशीही लाटांचे तांडव

मालवण : देवबाग गावास काल, बुधवारपासून सागराच्या अजस्त्र लाटांनी धडका देण्यास सुरुवात केल्याने देवबागवासीय भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या दोन दिवसांत सागराच्या महाकाय लाटांनी देवबाग ख्रिश्चनवाडी येथील शासनाने २० वर्षांपूर्वी घातलेला बंधारा उद्ध्वस्त केला आहे. आज, गुरुवारी पौर्णिमा असल्याने समुद्राच्या उधाणाच्या लाटांना जोर होता. समुद्राच्या महाकाय लाटा देवबाग गावावर धडकत आहेत. दरम्यान, देवबागची तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बुधवारी मध्यरात्री देवबागमधील शालिनी सुर्वे या अपंग व गरीब कुटुंबाचे झोपडीवजा घर उद्ध्वस्त झाले आहे. दोन दिवस सुरू झालेल्या मान्सून पावसाने किनारपट्टीवर हाहाकार माजवला. सागराच्या अजस्त्र लाटा किनारपट्टीवरील वस्तीत घुसल्याने संपूर्ण किनारपट्टी भीतीच्या छायेत वावरत आहे. देवबाग येथे काही ठिकाणी कमी उंचीच्या बंधाऱ्यामुळे लाटा वस्तीत घुसल्या. (प्रतिनिधी) बंधारा केला उद्ध्वस्त लाटांनी बंधाऱ्याला जोरदार धडक दिल्याने ख्रिश्चन वाडीतील बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणच्या बंधाऱ्याचे दगड ५० ते ७० फूट लांबवर जाऊन पडले होते. देवबाग ख्रिश्चनवाडी येथे २० वर्षांपूर्वी सागराच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिला होता. त्यावेळी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा कमी उंचीचा असल्याने लाटांनी तो पार केला. तिसऱ्या दिवशीही धोक्याचा बावटा सध्या किनारपट्टीवर ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, बंदर विभागाने तिसऱ्या दिवशीही धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. दरम्यान, मालवणचे निवासी नायब तहसीलदार सावंत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत देवबागची पाहणी केली व पंचनामे केले. देवगड किनारपट्टीवरही उधाण गेले दोन दिवस देवगड किनारपट्टीवर उधाण आले आहे. त्यामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटा किनारपट्टीवर आदळत आहेत. कुडाळात पावसाचे पाणी, कचरा रस्त्यावर; गेला गटार कुणीकडे?