शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात जास्त उमेदवार असल्याने चुरशीची लढत

By admin | Updated: April 13, 2016 23:23 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : खुले आरक्षण, दिग्गज उमेदवार, लढतीकडे सर्वांचेच लक्ष--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम -- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये सांगिर्डेवाडी मध्ये सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीत उतरले असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रणधुमाळी उडणार आहे. नेमक्या कोणत्या उमेदवाराची इथे सरशी ठरणार हे मात्र सध्या तरी कोणीच सांगू शकत नाहीत.कुडाळ नगरपंचायतीचा शेवटचा म्हणजे प्रभाग क्र. १७ सांगिर्डेवाडी आहे. या प्रभागामध्ये खुला संवर्ग असे आरक्षण पडले असून या प्रभागाची एकूण मतदार संख्या ८४१ आहे तर यामध्ये पुरुष ४०९ व महिला ४३२ एवढे मतदार आहेत. या प्रभागामध्ये विनायक राणे (काँग्रेस), अभय शिरसाट (शिवसेना), वैभव परब (भाजप), तर अपक्ष म्हणून विलास राणे, वैभव राणे, अमित राणे, अशोक केरकर, सिताराम नेमळेकर, नीलेश परब असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक विहिरींची योग्य प्रकारे निगा राखणे, गटार व्यवस्था, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच अन्य मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. या प्रभागात निवडणुकीला उभे असणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी नाराजीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वात जास्त उमेदवार असल्याने या ठिकाणी कोण विजयी होणार याची ओढ कुडाळवासियांना लागली असून याबाबत १८ एप्रिल रोजी पर्यंत कुडाळवासीयांना वाट बघावी लागणार आहे. आज मतदान प्रत्यक्षात तीन दिवसावर येऊन ठेपल्याने रंगत वाढली आहे.अभय शिरसाट-विनायक राणे आमने-सामनेया नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांचा विचार करता या प्रभागात सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभागणी या नऊ उमेदवारांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट हे शिवसेनेतून व या प्रभागाचे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व कुडाळचे उपसरपंच विनायक राणे हे काँग्रेसमधून लढत असून हे दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे.अपक्षांचा त्रास मोठ्या प्रमाणावरया प्रभागात मोठ्या प्रमाणात अपक्ष असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास येथील राजकीय पक्षांना पडणाऱ्या मताधिक्क्यावर होणार आहे. आपल्याकडील असलेली मते राखून ती मते दुसरीकडे जावू नयेत याकरिता प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागणार आहे.येथील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.